मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोहोळ मतदार संघामध्ये तब्बल ०६ कोटी रुपयांचा निधी:राजाभाऊ खरे (या मतदारसंघात निधी आणल्यामुळे मतदार संघातील नागरिकांकडुन राजाभाऊ खरे यांचा सन्मान) (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोहोळ मतदार संघावर विशेष लक्ष)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोहोळ मतदार संघामध्ये तब्बल ०६ कोटी रुपयांचा निधी:राजाभाऊ खरे

(या मतदारसंघात निधी आणल्यामुळे मतदार संघातील नागरिकांकडुन राजाभाऊ खरे यांचा सन्मान)

(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोहोळ मतदार संघावर विशेष लक्ष)

पंढरपूर, तालुक्यातील व उत्तर सोलापूर, तालुक्यातील मतदारसंघांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत तसेच विविध अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून तसेच रोजगार हमी मंत्री माननीय नामदार संदीपान मामा भुमरे यांच्या प्रयत्नातून मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर राखीव विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामासाठी तब्बल ०५ ते ०६ कोटी रुपयाचा निधी या मतदार संघात आणला असून या विविध कामेही पूर्ण होत आहेत व मतदार संघातून मागणी होईल तशी आम्ही निधी उपलब्ध करून ते काम पूर्ण तपासणी होऊन अशी माहिती उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्याबरोबरच उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या मतदारसंघांमध्ये सर्वात मोठा प्रश्न होता तर तो हा रस्त्यांचा होता या मतदारसंघातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती.
हा निधी मिळाल्यामुळे येथील सर्व शेतकरी व नागरिकांची मोठी सोय होणार असून याबाबत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

चौकट

२४७, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावांबरोबरच, गोपाळपूर ग्रामपंचायतच्या नवीन बांधकामास जवळ जवळ एक कोटी रुपयांचा निधी खरे साहेबांनी आणून गोपाळपूर व परिसरातील नागरिकांची मने जिंकली आहेत. गोपाळपुरातील ५ अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा, एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून यामुळे गोपाळपूर ग्रामस्थांच्या वतीने उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा सन्मान करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here