पंढरपूर तालुका किसान कॉंग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर भीमा पाटबंधारे उपविभागाने घेतली दखल (लवकरच देणार कार्यकारी अभियंता कॅनॉल येथे भेट)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील मेंढापूरपासून सुरूवात होणारी वितरीका (कॅनॉल) क्र.37 ही सुमारे 25 किलोमीटर अंतराची आहे. सदरचे काम अर्धवट झालेले आहे.याबाबत काम सुरू झालेपासून 8 ते 10 महिन्यांपासून पंढरपूर तालुका किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष अक्षय शेळके यांनी पाठपुरावा करत सदरच्या अर्धवट कामाबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कार्यकारी अभियंता सोा भिमा विकास विभाग क्र.2 सोलापूर यांनी थर्ड पार्टी इन्पेक्शन करणेचा आदेश दिला होता मात्र देखील सदरच्या कामाबाबत कोणत्याही स्वरूपाची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या व केवळ आंदोलन करू नये यासाठी पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी हे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे लक्षात आल्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अक्षय शेळके यांनी शेतकऱ्यांसह किसान कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सोमवार दि.13 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी भीमा पाटबंधारे उपविभाग करकंब ता.पंढरपूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपविभागीय अधिकारी जाधव यांनी समक्ष भेट देवून आंदोलनकर्त्यांची दखल घेऊन याबाबत पुढील योग्य ती कारवाई करण्याबाबतचे लेखी पत्र देवून सदरच्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले व मा.कार्यकारी अभियंता, संबंधित ठेकेदार व तृतीय पक्षीय तपासणी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत संबंधित तक्रारदार यांची प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या ठिकाणी एका बैठकीचे लवकरात लवकर आयोजित करावी व मा.कार्यकारी अभियंता यांची सदर कामाची क्षेत्रीय भेट ठेवावी असे लेखी पत्र दिल्यानंतर किसान कॉंग्रेसचे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी 1) वितरीका क्र.37 वरील दुरूस्तीचे काम इस्टीमेटप्रमाणे पुर्ण करण्यात यावे. 2) संबंधित ठेकेदाराची संस्था काळ्या यादीत टाकण्यात यावी. 3) थर्ड पार्टी इन्पेक्शन तात्काळ करण्यात यावे व त्यामध्ये आमचे 2 प्रतिनिधी घेण्यात यावेत. 4) ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ करण्यात यावी. 5) सदर काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे कोणतेही बिल अदा करू नये.अशा मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनास बहुजन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळू माने यांनी भेट देवून पाठींबा देत आंदोलनात सहभाग घेतला.
या आंदोलनासाठी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, जिल्हा सरचिटणीस हणमंत मोरे, किरण महाराज जाधव, जिल्हा सचिव अमर सुर्यवंशी, तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील, युवक शहराध्यक्ष संदिप शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना माढा लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुधाकर कवडे, शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव, शिवाजी धोत्रे, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षण सेलचे संग्राम जाधव, सर्जेराव, शेळके, दत्तात्रय बंडगर, लक्ष्मण शेळके, सुरेश गावडे, नवनाथ मदने, शिवाजी काळे, महादेव भुसनर,भगवान शेळके,संतोष देशमुख आदि कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here