माघी यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नागेश फाटे यांच्याकडून विठ्ठलाची मूर्ती भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दोन वर्षानंतर माघी यात्रेचा सोहळा शनिवारी मोठ्या भक्तीभावाने पंढरपुरात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथील करुन परवानगी दिल्याने वाकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याच निमित्ताने राज्य सरकारचे कृतज्ञा म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे येथे विठ्ठलाची मूर्ती भेट देवून त्यांचा सत्कार केला.

मागील दोन वर्षापासून प्रमुख चारही यात्रांवर कोरोनाचे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे वारकर्यांना पंढरपुरात येवून विठ्ठलाचे दर्शन घेता
आले नाही. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने प्रथमच माघी .यात्रेच्या सोहळ्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे लाखो भाविकांना आज माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी
होता आले. वारी भरल्यामुळे स्थानिक व्यापारी, छोटेमोठे व्यवसायिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथील करुन वारी सोहळ्यास परवानगी दिल्याने राज्य सरकारची कृतज्ञा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पंढरपूरकरांच्या वतीने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी विठ्ठलाची मूर्ती भेट देवून आणि तुळशीचा हार घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवक
काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,निवृत्ती पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी – पुणे – माघी यात्रेसाठी राज्य सरकारने परवाणगी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार व पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचा विठ्ठलाची मूर्ती भेट देवून सत्कार करताना नागेश फाटे, रविकांत वरपे, निवृत्ती पाटील आदी मान्यवर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here