सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांना न्याय कधी मिळणार :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांना न्याय कधी मिळणार :- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने चाटी गल्ली येथील बाबुचंद मुलचंद या दुकानात काम करणाऱ्या सतिश चिटकेन या कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी सहा महिन्यापुर्वी तक्रार दाखल करण्यात आले. परंतु अध्यापी या प्रकरणी कोणतेही कारवाई झालेली नाही. यावरून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कामगारांना न्याय कधी मिळणार असा सवाल विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी निवेदनाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्तांनाच केला आहे.
सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात आमच्या संघटनेच्या वतीने दि. ०१/०३/२०२१ रोजी श्री. सतीष सिद्राम चिटकेन हे चाटीगल्ली येथील शहा बाबुलाल मुलचंद (मालक) संजय बच्युलाल गुजर यांच्याकडे गेल्या ४० ते ४५ वर्ष काम केले आहेत. त्यांना दि. ०५/१०/२०२० रोजी कुठलीही पूर्ण सुचना न देता कामावरून कमी केले आहे. त्यांना मालकाकडून नुकसान भरपाई, सर्व्हीस, बोनस व येणे पगार मिळवून द्यावे असे निवेदन आपल्याकडे दिले होते. परंतु पाच महिने झाले सदर अर्जाबाबत अद्यापी न्याय मिळाला नाही. श्री. सतीष चिटकेन त्यांचे वय ६१ वर्षे असून त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. म्हणून त्यांची उपासमार होऊन आजारी पडले आहेत. आपल्या कार्यालयातील संबंधीत अधिकारी केवळ तारीख वाढवून देतात.
तरी माननीयांनी याबाबत विशेष लक्ष देऊन श्री. सतीष चिटकेन यांना न्याय मिळवून द्यावे. ही नंम्र विनंती. अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. याची नोंद द्यावी. असे नमुद करण्यात आले.
विष्णु कामपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या शिष्ठमंडळात दशरथ नंदाल, सतिश चिटकेन, विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीनिवास बोगा, गुरूनाथ कोळी, पप्पु शेख आदि कामगार सेना पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here