भीमा साखर कारखान्यात दुर्घटना कामगाराचा दुर्दैवी मृत्यू तर तीन जण जखमी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लिक्विड मोलॅसिस साठवणूक टाकीचा स्फोट होऊन अपघात झाला आहे. टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असून कारखान्यावरील चार हजार लिटर क्षमतेच्या मोलॅसिस टाकीचा स्फोट झाला आणि हे दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी झाले. कारखान्याच्या रसायन विभागात चार हजार लिटर क्षमतेच्या लिक्विड मोलॅसिसच्या दोन टाक्या असून यातील एका टाकीतून मोलॅसिस भरण्याचे आणि वितरणाचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच या टाकीचा अचानक वायूनिर्मितीमुळे दाब वाढून स्फोट झाला.
मोहोळ तालुक्यातील औंढी येथील ५९ वर्षे वयाचे कामगार विष्णू महादेव बचुटे हे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. अंकोली येथील ऋषिकेश शिवाजी शिंदे (वय २५) व इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले. त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मृत्युमुखी पडलेले विष्णू बचुटे हे सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते पण दुर्दैवाने त्यांचा या दुर्घटनेत अंत झाला. जेवणाच्या सुट्टीच्या वेळी ही घटना घडली. सुट्टी झाल्याने शिंदे हे हात पाय धुण्यासाठी थोडे बाजूला गेले होते तर मयत झालेले बचुटे हे तेथेच जेवणासाठी बसलेले असतानाच दुर्दैवाने त्यांच्या हा भयानक स्फोट झाला. मोलॅसिस असलेली टाकी फुटल्याने जवळच असलेल्या गोदामाचे देखील दोन्ही शटर तुटले आणि द्रवरूप मोलॅसिसमुळे साखरेची शेकडो पोती भिजून मोठे नुकसान झाले. निवृत्तीच्या उंबरठयावर असलेल्या कामगाराला असा दुर्दैवी मृत्यू आल्याने मोहोळ तालुक्यातून प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हृदय पिळवटून टाकणारे या घटनेमुळे एक जमाव प्रक्षुब्ध झाला व त्यांनी गव्हाणीत दगड टाकून त्यांचा आवेग व्यक्त केला. घटनास्थळी मोहोळ पोलीस स्थान काचे पोलीस निरीक्षक श्री सायकर यांनी प्रसंगावधान दाखवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here