काँग्रेसच्या आवाहनास महावितरणची साद खंडित वीजपुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार:हणमंत मोरे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

काँग्रेसच्या आवाहनास महावितरणची साद

खंडित वीजपुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार:हणमंत मोरे

पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीने महावितरण कंपनीस केलेल्या आवाहनास, महावितरण कंपनीकडून प्रतिसाद मिळाला असून, पंढरपूर तालुक्यात खंडित करण्यात आलेला विजपुरवठा, दोनच दिवसात सुरळीत होणार असल्याची माहिती, जिल्हा सरचिटणीस हनुमंत मोरे यांनी दिली आहे. पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीस निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत मोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शंकर सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, ओबीसी सेलचे मा. जिल्हाध्यक्ष समीर कोळी, शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव, शशिकांत चंदनशिवे, जिल्हा चिटणीस किशोर महाराज जाधव, जिल्हा सरचिटणीस अमर सूर्यवंशी, अश्फाक बागवान, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, बाळासाहेब आसबे, देवानंद इरकल आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडे असलेली थकीत विजबिले वसूल करण्यासाठी, महावितरण कंपनीने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वीजतोड मोहीम सुरू केली आहे. अनेक ट्रांसफार्मरची कनेक्शन सोडविण्यात आली आहेत. कोरोना काळानंतर स्थिर झालेल्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास पळवण्याचाच हा प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय झाली आहे. नुकताच शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस कारखान्यास गेलेला आहे. उसाची बिले मिळणे अद्याप बाकी आहे, यासाठी महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास मुदत देणे गरजेचे आहे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीकडून महावितरण कंपनीस करण्यात आले आहे. या मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भुतडा यांना देण्यात आले. यावेळी जय जवान जय किसानचे नारे लावण्यात आले.

 

चौकट

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने मार्च अखेरपर्यंत वीजबिले महावितरण कंपनीकडे भरावी, तालुक्यातील खंडित केलेला वीजपुरवठा दोन दिवसात सुरळीत केला जाईल, असे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

 

हनुमंत मोरे

सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here