भरधाव ट्रकच्या धडकेने सोलापूर येथील जुना पुना नाका एका इसमाचा जागीच मृत्यू!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

एसटी स्थानकापासून जवळच पुणेनाका परिसरातील मुख्याध्यापक भवन समोरील रस्त्यावर ट्रकखाली सापडून एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. शीतलनाथ आहेरकर असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.
आंबिसिटर हॉटेल, मुख्याध्यापक भवन समोरून सरळ निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रकच्या धडकेत इसम ठार झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली होती. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. भरदुपारी अवजड ट्रकच्या धडकेत इसम ठार झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी संताप
व्यक्त करत या नागरीवस्तीतून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी होवूनही कार्यवाही होत नसल्याची तक्रार माध्यमांसमोर केली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here