अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी पंढरपुर तालुक्याला रु.२.०७ कोटीचा निधी मंजूर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर तालुक्यातील आणखी ३२ गावांमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून रू. २.०७ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण समिती व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सौ. शोभा तानाजीराव वाघमोडे-देशमुख यांनी दिली. सन २०२१-२२ मधील आराखड्यानुसार पंढरपुर तालुक्याला सदर वस्त्यांच्या विकासासाठी विधान परिषदेचे आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नाने या चालू वर्षी रू.२.०७ कोटी निधी पंढरपूर तालुक्यासाठी मिळाला. सन २०२०-२१ करिता रु.८.५० कोटी निधी, सन २०१९-२० मध्ये रू.५.३० कोटी व वाढीव रु.४.९० कोटी असा एकूण तीन वर्षांत पंढरपूर तालुक्याला रू.२०.७७ कोटीचा निधी तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी मिळालेला आहे,असे सौ.शोभा तानाजीराव वाघमोडे-देशमुख यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी निधी मिळाल्यामुळे सदर वस्त्यांमधील रस्ते करणे, पेव्हिंग ब्लॉक, रस्ते खडीकरण, काँक्रिटचे रस्ते, पाणीपुरवठा, आर.ओ. प्लांट बसविणे, सीडी वर्क, बंदिस्त व भुमीगय गटार यामुळे या वस्त्यांना आणखी एक नवी झळाळी मिळणार आहे.
 निधी मंजूर असलेली गावे- कासेगांव रू.१६.५०  लाख, टाकळी रू.१७ लाख, करकंब रू.१८  लाख, सरकोली रू.८  लाख, उंबरे रू.५ लाख,  बाभुळगाव रू.५  लाख, गादेगांव रू.५  लाख, भाळवणी रू.७  लाख,  सांगवी  रू.३  लाख, अनवली रू.७  लाख, पोहोरगांव रू.६  लाख, केसकरवाडी रू.६  लाख, रांझणी रू.६  लाख, चळे रू.१४.७५ लाख, खर्डी रू.५ लाख, कोर्टी रू.१०  लाख, आंबे रू.४ लाख, करोळे रू.७  लाख, कान्हापुरी रू.३  लाख, मुंढेवाडी रू.३  लाख, उपरी रू.४ लाख, सुस्ते रू.५ लाख, मेंढापुर रू.१० लाख, पुळूज रू.५  लाख, आढीव रू.३  लाख, तनाळी रू.३  लाख, देवडे रू.३ लाख, पिराची कुरोली रू.३  लाख, आंबे चिंचोली रू.२  लाख, तारापुर रू.५.६५  लाख, गार्डी रू.५ लाख, खरसोळी रू.३ लाख असा एकूण रु.२.०७ कोटीचा निधी समाज कल्याण विभागाच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला.

 नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्यामुळे निश्चितच वरील वस्त्यांमध्ये सुधारणा व विकास होणार असून तेथील नागरिकांच्या गैरसोई दूर होऊन राहणीमानामध्येसुद्धा निश्चितच सुधारणा होणार आहे.  पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी वंचित वस्त्यांना निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून गट विकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात यावा जेणेकरून आलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे सोईचे होईल असे आवाहन समाजकल्याण समिती सदस्य मा.श्री.अतुल खरात, पंचायत समितीच्या सभापती मा.सौ.अर्चना व्हरगर, उपसभापती मा.सौ.राजश्री भोसले यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here