बि आर एस च्या एंट्रीमुळे भोकर येथील सर्व पक्षांना धडकी भोकर बाजार समिती निवडणूक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भोकर मागील वर्षभरापासून रखडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहिर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कान टवकारले आहेत.काग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता उलथून टाकण्यासाठी विरोधक कामाला लागले आहेत. उमेदवारी देताना तगडा आणि सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या उमेदवारांच्या शोधात सर्वांच्या नजरा भिरभिरत आहेत.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतकऱ्यांसाठी सोयीची असल्याने
बाजारपेठेला झळाळी मिळाली आणि पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापारी वर्गाला अच्छेदिन आलें आहेत. तेलंगणा,विदर्भ राज्यातील शेतकरी आपला माल इथे घेऊन येतात.प्रारंभी काहि काळ (कै.)आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांची सत्ता होती आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ताबा मिळवला आहे.बाजार समितीत एकुण(१८) संचालक आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस(१५) ,भाजपा(दोन), शिवसेना (एक) असे पक्षीय बलाबल होत.काग्रेसकडे एकहाती सत्ता असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले.बाजार पेठेत अनेक सूवीधांचा अभाव होता तो त्यांनी पुर्ण केला आहे.दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात या ना त्या कारणांवरून खटके उडाले.राजकारणात तरबेज असलेल्या अशोक चव्हाणांनी हस्तक्षेप करून त्यावर पडदा टाकला.वर्षभरापासुन बाजार समितीवर प्रशासक नियुक्त असल्याने ठोस निर्णय घेता आले नाहीत.बाजार पेठेतील मालाची आवक घटली आणि खासगी व्यापाऱ्यांनी” हात ” धूवून घेतले. आता निवडणुका जाहिर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समीतीवर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे.
स्थानिक पातळीवर युतीचं काय

तालुक्यातील बाजार समीतीवर झेंडा फडकविण्यासाठी काग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना,मनसे,बीआरएस पक्षांनी आतापासूनच तगड्या उमेदवारांच्या शोधात आहेत.मागील निवडणूकीत काँग्रेस पक्षानी दिलेल्या संचालका पैकी पून्हा कुणाला संधी द्यायची याचा निर्णय हायकंमाड यांच्यावर अवलंबून आहे. विरोधक चक्क कानटवाकारून आहेत.बिआरएस पक्षांमुळे असंतूष्ठाच्या कोलाटऊड्या सूरू झाल्याने काँग्रेस पक्षाची डोकें दुखी वाढणार आहे.राज्यात वरिष्ठ पातळीवर भाजपा,शिवसेना शिंदे गट याची युती तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,उद्धव ठाकरे शिवसेना गट यांच्यात महाआघाडी झाली आहे. स्थानिक पातळीवर हि दोस्ती कशी राहील यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here