प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सततच्या पावसाच्या नुकसान भरपाईसाठी माढा तहसील कार्यालया समोर आसूड आंदोलन करण्यात येणार.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माढा तालुक्यातील माढा, दारफळ, म्हैसगाव या सर्कल मध्ये ऑक्टो 2022 मध्ये सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले होते. शासनाच्या आदेशानुसार त्याचे पंचनामे ही झालेले आहेत. परंतु अद्याप पर्यंत देखील शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई अनेक वेळा तोंडी पाठपुरावा करून देखील मिळालेली नाही. तरी सरकार आणि प्रशासनाची याबाबतीत शेतकऱ्या प्रती अनस्था असल्याचे दिसून येत आहे. त्या बाबीकडे सरकार आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. दारफळ , माढा, म्हैसगाव सर्कल मधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता माढा तहसील कार्यालयात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आसूड आंदोलन करण्यात येणार आहे .होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल. या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे , आपचे जिल्हा अध्यक्ष संतोष कवले, विद्यार्थी तालुका सचिव संतोष कोळी, आबासाहेब कोळेकर , दत्तात्रय नाईकवाडे, किरण लवटे, रविकांत कोळेकर, अतुल थोरात, रमजान मुलानी, धीरज भांगे, संदीप चव्हाण, नितीन बापूराव चव्हाण, आदित्य लवटे, प्रणित वाघमारे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here