पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांची प्राथमिक निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. औदयोगिक परिसरातील गंगामाई हॉस्पिटल व वर्क फोर सेंटर प्रा.लि. सोलापूर या नामांकित उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे 156 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

             जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयाच्या वतीने    गुरवार दि. 27 जुलै 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक. सोलापूर या कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात आलेले होते. या मेळाव्यात औद्योगिक परिसरातील गंगामाई हॉस्पिटल व वर्क फोर सेंटर प्रा.लि. सोलापूर उद्योजकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्याकडून एकूण 580 रिक्त पदे कळविण्यात आलेली होती. ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बी.एसी, एम.एसी, बँकींग, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, बी.फार्म, डी.फार्म, नर्सिंग, पॅरामेडीकल, लॅब टेक्टीशियन, पॅरामेडीकल,मॅकॅनिकल अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी होती.

             जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. सदर रोजगार मेळाव्यात 298 नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामधून संबधित उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे 156 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. तसेच यापुढे होणाऱ्या रोजगार मेळाव्यात जास्तीत-जास्त उमेदवारांनी सहभाग घ्यावा  असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त श्री जाधव यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here