फुलचिंचोली-पंढरपूर एसटीला ४ वर्षापासून ‘ब्रेक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील फुलचिंचोली हे सर्वात मोठे गाव.पंढरपूर तिऱ्हे मार्ग रोडपासून आत ३ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावातील अनेक नागरिकाबरोबर फुलचिंचोली येथील शाळकरी विद्यार्थी हे सुस्ते,तारापूर,पंढरपूर या ठिकाणी शिकण्यास जातात. दहावीनंतर उच्च शिक्षणाची सोय पंढरपूर व सुस्ते येथे बारावीपर्यंत आहे. सुस्ते येथे बारावीपर्यंत शिक्षण असल्यामुळे अनेक मुली या येथे शिक्षण घेण्यास येतात.परंतु सध्या फुलचिंचोली एसटी बंद आहेच,त्याचप्रमाणे तिऱ्हे मार्ग सोलापूर वाहणाऱ्या एसटी बसेसची ही वेळ निश्चित नसल्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

पंढरपूर ते फुल चिंचोली एसटी महामंडळाला बस सुरू करण्याबाबत विनंती करून सुद्धा आगारप्रमुख बस सोडण्यास तयार नाहीत.पंढरपूर ते फुलचिंचोली गेली ४ वर्ष झाली बंद आहे. संबंधित अधिकारी यांना वारंवार विनंती करूनही बस सुरू झाली नाही. ग्रामपंचायत फुलचिंचोली यांनीही पत्रव्यवहार केला. संबंधित अधिकारी यांना भेटून बस सुरू करण्याबाबत विनंती केली सामाजिक संघटनांनी सुध्दा आपली निवेदन दिले तरी सुद्धा आगारप्रमुख हे बस सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत ह्या मार्गावर तिन काॅलेज आहेत दोन माध्यमिक विद्यालय आहेत मोठ्या प्रमाणात मुलींची संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पंढरपूर येथे जावे लागते तसेच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी व भाजीपाला जास्त प्रमाणात असल्याने विक्रीसाठी शहरात जावे लागते त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीने बस सुरू करण्यांची मागणी केली जात आहे.
या उलट मोहोळ ते फुलचिंचोली एसटी अखंडितपणे सेवा देत आहे. सकाळी १०.०० वाजता व मुक्कामी फुलचिंचोली एसटी न चुकता येतेच. पंढरपूर आगारातील अधिकारी व कर्मचारी हे फुल चिंचोली एसटी प्रवासी नसल्याचे सांगतात. परंतु या मार्गावर अनेक गावे आहेत याचा फायदा या एसटीला होऊ शकतो. त्यामुळे सकाळी एक व संध्याकाळी मुक्कामी पंढरपूर- फुलचिंचोली एसटी ताबडतोब सुरू करावी अशी मागणी फुलचिंचोली ग्रामस्थातून होत आहे.


चौकट-
पंढरपूर आगाराचे संबंधित अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य या नात्याने विनंती करून सुद्धा बस सोडली जात नाही. ८वी ते १२ वी ला शिकणाऱ्या मुली शिक्षणासाठी शहरात जातात ,त्या मुली आमच्याकडे बस सुरू करण्याबाबत येतात.आपण आमच्या सोबत पंढरपूरला चला आम्हाला किती त्रास होतो ते समजेल, अशा त्या मुली म्हणतात.गावापासून 3 किलोमीटर चालत जाणे बसस्थानकापासून काॅलेज पर्यंत चालत जाणे.परत संध्याकाळी येताना तिच परिस्थिती आहे,तरी आम्ही आगारप्रमुख यांना विनंती आपण ताबडतोब बस सुरू नाही केली तर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या डेपो मध्ये येऊन आंदोलन करण्यात येईल.

सीमा चंद्रशेखर जाधव

ग्रा.पं.सदस्या फुलचिंचोली

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here