नियोजित 25 तारखेचा पवार साहेबांचा दौरा लांबणीवर (अधिवेशन चालू असल्यामुळे पुढील महिन्यात होणार दौरा)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नियोजित 25 तारखेचा पवार साहेबांचा दौरा लांबणीवर

(अधिवेशन चालू असल्यामुळे पुढील महिन्यात होणार दौरा)

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याने काँग्रेस, शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टीची धाकधूक वाढली आहे. मागच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेते सुधीर खरटमल माजी महापौर नलिनी चंदेले माजी महापौर यु एन बेरिया यांच्यासह शेकडो वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

शरद पवार येणाऱ्या 25 मार्च रोजी सोलापूर दौर्‍यावर येणार असल्याची माहिती मिळाली. या दौर्‍यात अनेक दिग्गज नेत्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामध्ये माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, नगरसेवक तोफिक शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह आता तर काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या सुद्धा नावाची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे या नेत्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवारांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. याच वेळी त्यांनी मी सोलापूरला पुन्हा येतोय असे सांगितले होते. या दौऱ्याची सोलापुरात जोरदार तयारी सुरु झाली.

दरम्यान राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे अधिवेशनात अडकले आहेत. त्यामुळे येणारा 25 मार्च रोजीचा शरद पवार यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली असून हा दौरा 25 तारखेनंतर आठ दिवसांनी होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here