श्री पांडुरंग कारखान्याकडून पोळा सणासाठी रू. 126/- ऊस बिल बँकेत जमा! कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत प्र. मे टन रू. 2426/- रुपये अदा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2021- 22 मध्ये गाळप केलेल्या उसास पोळा सणासाठी प्रति मे. टन रुपये 126/- प्रमाणे ऊस बिल जाहीर केले असून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर रक्कम जमा केली आहे कारखान्याने या हंगामात गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसास प्रति मे. टन रुपये 2426/- ऊस दर अदा केला असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन मा आ श्री प्रशांतराव परिचारक यांनी दिली यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा श्री कैलास खुळे ,संचालक आणी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते
श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक यांनी घालून दिलेल्या आदर्शनुसार कारखान्याची वाटचाल चालू आहे गळीत हंगाम 2021 22 मधील उर्वरित एफ आर पी ची रक्कमही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दीपावली सणाच्या अगोदर दिली जाईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मा आ श्री प्रशांतराव परिचारक यांनी दिली

यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की मागील गळीत हंगामाच्या वेळी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक दवाखान्यामध्ये अडमिट असतानाही त्यांनी फोन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोळा सणासाठी रकम देण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार त्यावेळीही पोळा सणासाठी ऊस बिल अदा केले होते त्यांच्याच आदर्श नुसार यावेळीहीं मा श्री प्रशांतराव परिचारक मालक यांचे सूचनेनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोळा सणासाठी ऊस बिलापोटी रक्कम अदा करीत आहोत
गळीत हंगाम 2021 -22 मध्ये श्री पांडुरंग कारखाना 201 दिवस चालून 12 लाख 51 हजार मे टन ऊस गाळप करून 14 लाख 2५ हजार क्वी साखर पोती उत्पादित केली आहेत या हंगामात कारखान्याचा साखर उतारा 11. 65 टक्के राहिला असून हा साखर उतारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे त्याचबरोबर कारखान्याच्या को जनरेशन प्लांट मधून.8.92 कोटी युनिट निर्माण करून. 4.68 कोटी युनिटची एम एस ई बी ला विक्री केली आहे कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पामधूनही या हंगामात 1कोटी 28 लाख लिटरचे उत्पादन झाले आहे आसवांनी प्रकल्पामध्ये उत्पादित झालेल्या सर्व उत्पादनाची विक्री सर्वोच्च दराने चालू असून कारखान्यास त्यामधूनही उत्पन्न मिळत आहे गळीत हंगाम 2021- 22 मध्ये कारखान्याने सर्वच क्षेत्रात उच्चांक निर्माण केले आहेत.

पुढील गळीत हंगाम 2022 -23 मध्ये कारखान्याकडे सुमारे 14 हजार हेक्टरच्या ऊस नोंदी असून त्यामधून सुमारे 15 लाख मे टन ऊस उपलब्ध होईल त्यासाठी लागणारी सर्व तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली असून त्यांना आडव्हान्स हप्त्याचेही वाटप केले आहे कारखान्याचा गळीत हंगाम 2022- 23 हा 1 आक्टोबर 2022 रोजी सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here