देगावच्या माजी सरपंच सौ. सीमा संजय घाडगे यांच्या प्रयत्नांना अखेर यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूरपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असणाऱ्या व गेल्या दोन वर्षात उपक्रमशील ग्रामपंचायत अशी ओळख मिळवलेल्या देगाव तालुका पंढरपूर येथील आरोग्य उपकेंद्राच्या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून हिरवा कंदील मिळाला असून याबाबत आरोग्य उपकेंद्रास मान्यता प्राप्त झाल्याचा शासन आदेश काल निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून देगावच्या माजी सरपंच सौ. सीमा संजय घाडगे यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे. पंढरपूर शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असणाऱ्या देगाव या गावची लोकसंख्या जवळपास सात हजारांच्या आसपास आहे. मात्र गावात सरकारी दवाखाना नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखाने किंवा पंढरपूर येथील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.सोबतच वारी काळात या गावाच्या हद्दीमध्ये लाखो वारकऱ्यांचे वास्तव्य असते.तसेच या गावातील निम्म्यापेक्षा जास्त लोक हे कष्टकरी व कामगार असल्याने दवाखान्यांचा खर्च परवडत नाही त्यामुळे गावातच स्वतःच्या हक्काचे आरोग्य उपकेंद्र असावे यासाठी सरपंच पदाची सुती सूत्रे हाती घेतल्यानंतर देगावच्या माजी सरपंच सीमा संजय घाडगे यांनी गावात आरोग्य उपकेंद्र व्हावे यासाठी मंत्रालयात परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता.तसेच गेल्या दोन वर्षापासून सातत्याने हे उपकेंद्र मंजूर व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते.अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर काल या आरोग्य उपकेंद्रास महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे संपूर्ण देगाव गावामध्ये आनंद साजरा केला जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला असून लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याचे देगावचे उपसरपंच श्री. समाधान भोई यांनी सांगितले आहे.

“देगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन वर्षांपूर्वी सगळ्यात पहिल्यांदा गावात आरोग्याच्या चांगल्या व उत्तम तसेच लोकांना मोफत सोयी कशा देता येतील यासाठी आरोग्य उपकेंद्राचे स्वप्न पाहिले होते.गेल्या दोन वर्षांपासून यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू होता.मात्र क्लिष्ट प्रक्रियेमुळे यात अनेक अडथळे येत होते. अखेर काल आरोग्य उपकेंद्रास मंजुरी मिळाल्याने माझे स्वप्न साकार झाले आहे.यासाठी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांची विशेष मदत झाली सोबतच जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक आमच्या गावचे नेते अभिजीत पाटील तसेच,प्रमोद बनगोसावी साहेब यासह अनेकांचे सहकार्य लाभले आहे.त्या सर्वांची सौ.सीमा संजय घाडगे ऋणी राहीन असे त्यांनी यावेळी सांगितले.”

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here