औद्योगिक शाळेतील दहावी परीक्षार्थींची बैठक व्यवस्था

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, (जि. मा. का) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळाची एसएससी (दहावी) बोर्ड परीक्षा दि.02 मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा, सोलापूर (नॉर्थकोट हायस्कूल) हे परीक्षा केंद्र असून, परीक्षा केंद्राचा क्रमांक 3007 आहे. या परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ही महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा, सोलापूर (नॉर्थकोट हायस्कूल) व सेंट जोसेफ हायस्कूल, सोलापूर या उपकेंद्रावर करण्यात आली असल्याची माहिती केंद्रसंचालक श्रीमती आर. वाय भावसार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा, सोलापूर (नॉर्थकोट हायस्कूल) विद्यार्थी आसन क्र. C208719 ते 209008 असे एकूण 290 (इंग्रजी माध्यम), C208306 ते 208318 व C209009 ते C209017 एकूण 22 विद्यार्थी (मराठी माध्यम) तसेच सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर विद्यार्थी आसन क्र. C208319 ते 208718 एकूण 400  (इंग्रजी माध्यम)  विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here