दामाजी कारखान्याचे मतदार यादी संदर्भातील पिटीशन मे।उच्च न्यायालयाने फेटाळले -अॅड. सुहास इनामदार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दामाजी कारखान्याच्या प्रशासनाने नियमानुसार सादर केलेली अंतीम मतदार यादी योग्य असताना दौलत माने व रमेश भांजे यांनी मतदारांची नांवे कमी करणेबाबत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक, सोलापूर यांचे विरोधात मे. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेले पिटीशन फेटाळण्यात आले असून मतदारांचे हक्क अबाधित ठेवण्यात आलेले आहे.

शासकीय आॅफिसचे कामकाज कायद्याच्या चौकटीत राहून चालत असते. जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक, सोलापूर यांनी कायदेशीर तपासणी करुन नियमानुसार श्री संत दामाजी साखर कारखान्याची मतदार
यादी योग्य रितीने प्रसिध्द केलेचे अॅड. राजशेखर गोविलकर व अॅड.सुहास इनामदार यांनी मे. उच्च न्यायालय, मुंबई यांचे निदर्शनास अणुन दिल्याने सदर यादी ग्राहय मानून मे. उच्च न्यायालय, मुंबईचे मुख्य न्यायाधिश मा. सांबरेसाहेब यांनी फिर्यादींनी दाखल केलेले पिटीशन फेटाळले आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून मतदार यादीबाबत कायदेशीर दावे व प्रतिदावे संपुष्ठात आलेले आहेत. अशी माहिती अॅड. सुहास इनामदार यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here