यश-अपयश यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे महत्वाचे -प्रशासन अधिष्ठाता डॉ.मिलिंद कुलकर्णी स्वेरीत राज्य स्तरीय तांत्रिक उपक्रम‘क्षितीज २ के २२’ संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने क्षितीज’ सारख्या बौद्धिक स्पर्धेमुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एक खास व्यासपीठ मिळते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासस्टेज डेअरिंगज्ञान प्रदर्शन,हजर जबाबीपणासंभाषण कौशल्य,कार्यक्रम व्यवस्थापन आणि नेतृत्व गुण आदी गुणांचा विकास होण्यासाठी वाव मिळतो. म्हणून अशा स्पर्धेत यश अपयश यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मग त्या स्पर्धेतपरीक्षेत यश मिळो अथवा न मिळो. यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रामाणिक प्रयत्न करूनझोकून देवून परिश्रम केल्यास यश आपल्यापासून दूर जावू शकत नाही. परंतु हे सर्व करताना अंगी खिलाडीवृत्ती मात्र जोपासायला हवी.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रशासन अधिष्ठाता डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

         येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयपंढरपूरमध्ये मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन)द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया)कोलकाता स्टुडंट्स चॅप्टर आणि अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंगरेफ्रिजरेटींग अँड एअर कंडिशनींग इंजिनिअर्स (अॅश्रे) च्या पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या क्षितीज २ के २२’ या तांत्रिक संशोधन उपक्रमाचा आज समारोप करण्यात आला. याप्रसंगी प्रशासन अधिष्ठाता डॉ.मिलिंद कुलकर्णी हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या समारोपाच्या कार्यक्रमात सुरवातीला प्रा. संदिपराज साळुंखे यांनी क्षितीज २ के २२’ इव्हेंट विषयी माहिती दिली. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जनरल क्विझ,कॅम्पस रिक्रूटमेंट प्रोसेसपेपर प्रेझेंटेशन,बी.जी.एम.आय.कॅड वॉर व पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये विजेते ठरलेले विद्यार्थी,अनुक्रमे स्पर्धेचा प्रकारप्रथम व द्वितीय क्रमांक पुढील प्रमाणे-सीपीआर स्पर्धेत शरयू डांगे (प्रथम) राजनंदनी पवार (द्वितीय)पेपर प्रेझेन्टेशन मध्ये नचिकेत कुलकर्णी (प्रथम) अंकिता घाटे (द्वितीय),जनरल क्विझ मध्ये रणजित खंकाळ (प्रथम)श्रेया शिंदे व आरती चौगुले (द्वितीय)पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत लक्ष्मीनारायण गड्डम (प्रथम) नचिकेत कुलकर्णी (द्वितीय)कॅड वॉर स्पर्धेत आशुतोष उडता (प्रथम)श्रीहर्ष हर्सुर (द्वितीय)तर बी.जी.एम.आय. स्पर्धेत ऋतुराज तारापुरकर आणि त्यांची टीम (प्रथम)प्रसाद वाघमारे आणि त्यांची टीम (द्वितीय) आदींनी स्पर्धेत बक्षिसे मिळविली. परीक्षक म्हणून संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे,डॉ. एस.ए. सोनवणेप्रा. एस. व्ही. जाधव यांनी काम पाहिले. यावेळी राहुल सिद्राम,पूजा मुळेश्रुती घाडगेअतुल बिराजदार या विद्यार्थ्यांनी क्षितीज-२ के २२’ बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेसाठी ए.जी.पाटील महाविद्यालयसोलापूर,वालचंद कॉलेजसोलापूरगव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजसोलापूरफॅबटेक,सांगोलास्वेरीज पॉलिटेक्निकपंढरपूर या महाविद्यालयांतून जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून स्मृतीचिन्हेप्रमाणपत्रे तर अमेरिकेतील युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंड या बँकेचे टेक्निकल इंजिनिअर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी रोहित उमर्जीकर यांच्या वतीने स्पर्धेतील प्रत्येक विभागातील प्रथम विजेत्यास अमेरिकन एक डॉलर भेट देण्यात आला तर महाविद्यालयातर्फे एकूण पंधरा हजार रुपयांची बक्षिसे विजयी स्पर्धकांना देण्यात आली. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी.मिसाळविद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटीलमेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.एस. वांगीकरप्रा. सचिन गवळीप्रा. श्रीकृष्ण भोसलेक्षितीजचे समन्वयक प्रा. संजय मोरेप्रा. बी.डी. गायकवाडमेसाचे अध्यक्ष स्वप्नील माशाळकरमेसा उपाध्यक्ष अविराज नागटिळकसचिवा दिप्ती कदम,निखील शिंदेमेसाचे पदाधिकारी व विविध महाविद्यालयातून आलेले सहभागी विद्यार्थीस्वेरीचे प्राध्यापकवर्ग व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. दिगंबर काशीद यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here