तर..!भारत-चीनचे कोणतेही शहर उडवू शकतो!!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

तर..!भारत-चीनचे कोणतेही शहर उडवू शकतो!!

भारत २३ सप्टेंबर रोजी अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. अण्वस्त्रे वाहून नेणाची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्राची ही आठवी चाचणी असणार आहे.

हे ५ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या लक्ष्याचा भेद घेऊ शकते. ५ हजार किलोमीटरच्या परिघात चीनची अनेक शहरे येत असल्याने या चाचणीनंतर चीनची चिंता वाढणार आहे. शिवाय या क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असल्याने पाकिस्तानलाही धडकी बसली आहे.

चीन-पाकची ताकद किती? –
– पाकिस्तानचे शाहीन-२ हे २५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.
– चीनचे डीएफ-४१ क्षेपणास्त्र १२००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

अग्नी-५ क्षेपणास्त्र –
– विकसित करणारी संस्था : संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ)
– लांबी १७ मीटर, रुंदी : २ मीटर –
– रेंज : ५००० किलोमीटर
– वजन : ५० टन
– प्रकार : इंटर कॉन्टिनेंटल बॅलास्टिक मिसाईल (आयसीबीएम)
– वजन वाहक क्षमता : १.५ टन
– कमाल वेग : २९ हजार कि.मी. प्रति तास

‘आयसीबीएम’ क्लबमध्ये भारतही
सध्या जगात रशिया, अमेरिका, चीन, फ्रांस, इस्त्रायल, इंग्लंड आणि उत्तर कोरिया या देशांकडे आंतरखंडीय (इंटर काँटिनेंटल) बॅलास्टिक मिसाईल (आयसीबीएम) आहेत. या क्लबमध्ये सामील होणारा भारत हा आठवा देश ठरणार आहे.

अग्नी-५ ची बलस्थाने –
– हे एकाचवेळी अनेक भेदक शस्त्रे वाहून नेऊ शकते.
– मल्टिपल इंडिपेडंटली टार्गेटेबल रिएन्ट्री व्हेहिकल (एमआयआरव्ही) या तंत्रज्ञाने सज्ज असल्याने हे क्षेपणास्त्र एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. याचा वेग मॅक २४ इतका म्हणजे आवाजाच्या वेगाच्या २४ पट आहे.
– लाँचिंगमध्ये केनिस्टार तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने हे क्षेपणास्त्र सहजपणे कुठेही वाहून नेता येते. याचा वापर करणे सोपे असल्याने हे देशात कुठेही तैनात ठेवता येऊ शकते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here