जुना प्रभाग २२ मधील रामवाड़ी व आजूबाजू भागातील पाणीपुरवठा, रस्ते, बंद कुपनलिका आदी समस्याविषयी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले सोमपा आयुक्तांना निवेदन सादर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जूना प्रभाग २२ मधील रामवाड़ी भागातील पोगुल मळा, पारशी बंगला, धोंडीबा वस्ती, गैबीपीर नगर येथील पाणीपुरवठा व नवीन रस्ते व रस्ते दुरुस्ती, बंद पडलेले कूपनलिका चालू करणे आदी समस्याविषयी सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका महिला बालकल्याण समितीचे माजी सभापती अँड सौ. अश्विनी ज्ञानेश्वर जाधव यांनी शिष्टमंडळासह सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन दिले.

जूना प्रभाग २२ मधील रामवाड़ी पोगुल मळा, पारशी बंगला, धोंडीबा वस्ती, गैबीपीर नगर या भागात गोरगरीब, कष्टकरी, कामगारांची वस्ती असून ते कामावर गेल्याशिवाय चूल पेटत नाही. या भागात गेल्या अनेक महिन्यापासून रात्री अपरात्री अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना कामधंदा सोडून पाणी कधी येते यासाठी वाट पहावे लागत आहे त्यामुळे त्यांची रोजीरोटी बुडत आहे म्हणून पाणी सकाळी एका ठराविक वेळेत प्रेशरने सोडावे. तसेच बहुतेक कुपनलिका बंद आहेत त्या ताबड़तोब दुरुस्त करण्यात यावेत, या भागातील अनेक रस्ते खराब झाले असून नागरिकांचे अपघात होऊन त्याचा त्रास होत आहे. अनेकांना अंग दुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे या भागात नवीन रस्ते करण्यात यावेत, काही रस्ते दुरुस्ती करण्यात यावे. आदि मागण्याचे निवेदन सोलापुर महानगपालिकेचे आयुक्त मा. शीतल तेली उगले यांना देण्यात आले.
यावेळी मा. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच वरील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी रामवाडी भागातील अन्नपूर्णा कन्नूरकर, मोहसीना मुल्ला, पुष्पा आलाट, चंदा स्वामी, अनिता धनगर, अन्नपूर्णा स्वामी, लक्ष्मी शिंदे, कस्तुरी बागेवाडी, चंद्रकला भिसे, नागु जाधव, लक्ष्मी जाधव यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here