खा. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी विविध मागण्या बाबत केली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे मागणी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण रस्त्याचे तसेच अक्कलकोट मधील रिंगरोड च्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी अशी मागणी खासदार डॉ जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे केली आहे,
तेरामैल टाकळी ते कोर्सेगाव आणि कुमठे, तडवळ, पानमंगरुळ, करजगी आणि तीर्थक्षेत्र अक्कलकोट मार्गे सांगवी शिरशी, शिरवळ, वागदरी, ते पुढे मराठवाडा मधील आलुर मुरूम या सह अन्य राज्यांना जोडणाऱ्या महत्वपूर्ण रस्त्याच्या कामा सह अक्कलकोट मधील रिंगरोड, च्या कामाला ही त्वरित प्रारंभ करण्याची मागणी खासदार डॉ जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे,
याबाबत नितीन गडकरी यांनी होकार दिला असून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे असेही खासदार डॉ स्वामी यांनी सांगितले, तसेच सुरत ते चेन्नई या महामार्गाच्या कामाला ही लवकर सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यानी सांगितले, संसदेच्या अधिवेशनात खासदार डॉ स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सुरू असलेली कामे तसेच प्रस्तावित कामांबाबत नितीन गडकरी यांची भेट घेतली होती, यावेळी गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत सकारात्मकता दाखविली होती, टाकळी तेरामैल ते बरुर मार्गे कोर्सेगाव, पुढे तसेच तोळनुर नागणसुर ते करजगी मार्गे अफजलपूर असा देखील रस्ता मधून होऊ शकतो या रस्त्याच्या बाबतीत ही खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराज यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. तर टाकळी बरुर कोर्सेगाव, तडवळ करजगी जेऊर, असा अक्कलकोट वरून राष्ट्रीय महामार्ग घोषित करून या महामार्गाच्या कामाला ही लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.
तेरा मैल टाकळी ते कोर्सेगाव ते सरळ तोळनुर, माशाळ, करजगी असा नविन कर्नाटक ला जाणारा मधला रस्ता सर्वाना सोयीस्कर होणार आहे तो रस्ता ही करण्यात यावा अशी या भागातील लोकांची मागणी आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here