रणजित (भैय्या) शिंदे यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथे विविध विकास कामांचे उद्घाटन! अजून विकास कामासाठी निधी लागल्यास देण्यास तयार:रणजित (भैय्या) शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रणजित (भैय्या) शिंदे यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथे विविध विकास कामांचे उद्घाटन!

अजून विकास कामासाठी निधी लागल्यास देण्यास तयार:रणजित (भैय्या) शिंदे

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील आज झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य व सोलापूर जिल्हा दुध व प्रक्रिया संघाचे नूतन संचालक मा.रणजित (भैय्या) शिंदे व गणेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी श्रीक्षेत्र सुर्यनारायण मंदिरामध्ये मा.रणजीत भैय्या शिंदे यांचा सत्कार मेजर लक्ष्मण (तात्या) कोले यांनी केला त्याचबरोबर गणेश (दादा) पाटील यांचा सत्कार दत्तात्रय कोले यांनी केला. तसेच मा पं. समिती सदस्य औदुंबर (तात्या) मेटकरी यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवातालुकाध्यक्ष संतोष (तात्या) चव्हाण यांनी केला. त्याचबरोबर संचालक पोपट मामा चव्हाण यांचा सत्कार धनाजी अहिरे यांनी केला.

यावेळी २५१५ मधून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या आव्हारात पेवींग ब्लॉगच्या कामाचे, ३०५४मधून कागदे वस्ती येथील रस्त्याच्या कामाचे तसेच हराळे वस्ती ते गुंड वस्ती पर्यंत रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य तसेच दूध संघाचे नूतन संचालक रणजित (भैय्या) शिंदे यांनी सर्व उपस्थित चिंचोली येथील नागरिकांना सांगितले की, आम्ही गावातील विकास कामांमध्ये कधीही कमी पडणार नाही रस्त्याच्या कामासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी व गावातील इतर विविध कामासाठी अजून निधी देण्यास मी तयार असल्याचे यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

यावेळी लक्ष्मण तात्यां कोले, बापूराव कोले, संतोष तात्या चव्हाण, अजय भाऊ देशमुख मा पं. समिती सदस्य औदुंबर तात्या मेटकरी, या बरोबरच मेजर संदीप कोले,लक्ष्मण कोले, स्वप्निल कोले, श्रीमंत खरात, बळीराम बनसोडे, सुनील माने,धनाजी आहेर,लक्ष्मण चव्हाण, शाहू मस्के, श्रीकांत नलवडे, लहू शिंगटे, पांडूरंग माळी, अनिल पाटील, तुकाराम हराळे, श्रीकांत चव्हाण,साजन माने,गणेशभाऊ मस्के,, अक्षय बनसोडे, औदुंबर मेटकरी, तानाजी हराळे, दिलीप वसेकर, दत्तात्रेय चव्हाण, तानाजी डुबल, सोमनाथ डुबल, सुहास वसेकर,जोतीराम वसेकर, नितीन हिंगमिरे, आशीष क्षीरसागर आदी, सर्वजण व शिंदे परिवारावर व प्रेम करणारे समस्त नारायण चिंचोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here