किसनवीर – खंडाळा साखर कारखान्याचा गाळप हंगामास सुरुवात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज खंडाळा येथील किसनवीर – खंडाळा साखर कारखान्याचा सन २०२२-२३ या ऊस गाळप हंगामासाठी मोळी आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्री. रामराजे नाईक – निंबाळकर यांच्या शुभहस्ते तसेच आमदार श्री. शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून मुहूर्त करण्यात आला.
कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी चालू गाळप हंगामात आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडेच गाळपास पाठवून सहकार्य करावे. चालू गळीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगून सर्व सभासद, ऊस पुरवठा करणारे शेतकरी, अधिकारी-कर्मचारी या सर्वांना दिपावली व गाळप हंगामाकरीता शुभेच्छा दिल्या.यावेळी किसनवीर व खंडाळा कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, शेतकरी सभासद व सर्व अधिकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here