कार्यकर्त्यांच्या जीवावर कॉंग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल हे निश्चित :- सुशीलकुमार शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

“आजपर्यंत आलेल्या अनेक वादळांवर मात करीत काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली हा इतिहास आहे. या पुढेही काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभारी घेईल हे निश्चित.” अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

आज रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी सेक्रेटरी व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेस भवन सोलापूर येथील बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सत्ता असणे आणि नसणे हे दोन्ही काळ यापूर्वी देखील काँग्रेसने पहिले आहेत. जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळवली आहे. जे जे लोक काँग्रेस पक्ष सोडून गेले ते पुन्हा काँग्रेस पक्षात सक्रिय होतील. काँग्रेस पक्षातच त्यांना न्याय व सन्मान मिळेल याची त्यांनाही आता खात्री पटायला लागली आहे. मात्र काँग्रेस पक्षात राहून जे बदमाशी करत आहेत त्यांची येणाऱ्या काळात नक्कीच योग्य ती जागा दाखवू. काँग्रेसमध्ये एका व्यक्तीला किती पदे द्यायची किंवा एखाद्याला पद द्यायचे अथवा नाही यात काहीतरी तारतम्य असते. मी स्वत: दोन वेळा पराभूत झालो असलो तरी खचलेलो नाही. काँग्रेस पक्षासाठी कार्य करत होतो, आहे आणि राहणारच. आगामी शहर काँग्रेसमधील सर्व सूत्रे प्रणिती शिंदे यांच्याकडेच असणार. कार्यकर्त्यांनी सर्व झाले गेले विसरून कामाला लागावे. यापुढे पक्षाकडून बूथ विस्तार अभियान सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने या माध्यमातून बूथ निहाय पक्ष संघटनेची नूतन फळी जोडावी. येता काळ आपलाच असेल याची सर्वांनीच खात्री बाळगावी.

महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल म्हणाल्या की, पक्षाकडून बूथ विस्तार अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल ॲपच्या माध्यमातून नूतन सभासद नोंदणी यापुढे केली जाईल.
महानगरपालिकेतील प्रत्येक इच्छुक उमेदवाराने जास्तीत जास्त सभासद नोंदवून आपल्या बूथचे संघटन मजबूत करून घ्यावे.
बैठकीला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रदेशच्या निरीक्षक सोनम पटेल, निरीक्षक चेतन चव्हाण, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, संयोजक- कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, अरुण शर्मा, माजी महापौर प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड, आरिफ शेख, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, ऍड मनीष गडदे, पंडित सातपुते, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रकाश पाटील, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, अरुण साठे, उदय चाकोते, बाबुराव म्हेत्रे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, हाजी तौफीक हत्तुरे, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, नगरसेविका परवीन इनामदार, वैष्णवीताई करगुळे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, युवक अध्यक्ष पवन गायकवाड, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, यंत्रमाग सेल अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, सिद्राम अट्टेलुर, हारून शेख, भोजराज पवार, दत्तू बंदपट्टे, जेम्स जंगम, वाहिद नदाफ, मधुकर आठवले, उपेंद्र ठाकर, आझम सैफन, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कदम, हाजीमलंग नदाफ, AD चिनीवार, हसीब नदाफ, हनमंतु सायबोलु, राजन कामत, अशोक कलशेट्टी, अनिल मस्के, सुभाष चव्हाण, केशव इंगळे, नामदेव फुलारी, चंद्रकांत कोंडगुळे, जाबिर अल्लोळी, युवराज जाधव, सुशील बंदपट्टे, सुमन जाधव, वाहिद विजापुरे, तिरुपती परकीपंडला, सैफन शेख, योगेश मार्गम, प्रमिलाताई तुपलवंडे, कमरूनिस्सा बागवान, अंजलीताई मंगोडेकर, वीणाताई देवकते, पुरुषोत्तम श्रीगादी, अशोक चव्हाण, नागनाथ बंगाळे, लक्ष्मण भोसले, प्रतीक आबुटे, अनुपम शहा, डॉ आप्पासाहेब बगले, राहुल बोलकोटे, श्रद्धाताई हुल्लेनवरू, रामसिंग आंबेवाले, परशुराम सत्तारेवाले, सायमन गट्टू, फारुख कमिशनर, रमाकांत साळुंखे, राहुल वर्धा, राहुल गोयल, सुरेश तोडकरी, दिनेश म्हेत्रे, लखन गायकवाड, मल्लिनाथ सोलापुरे, सागर शहा, समीर काझी, प्रवीण जाधव, दीनानाथ शेळके, मोतीलाल चव्हाण, सुशीलकुमार म्हेत्रे, शाकिर सगरी, जिशान सय्यद, संजय गायकवाड, एजाज शेख, रजाक कादरी, श्रीनिवास रामगल, सोमनाथ व्हटकर, सुभाष वाघमारे, राजेंद्र शिरकुल, विजय पार्सेकर,हरीश गायकवाड, राजेश झंपले, रामकृष्ण पल्ली, मुमताज तांबोळी, सुरेखा घाडगे,अनिता भालेराव, मोनिका सरकार, रतन डोळसे, चंदाताई काळे, रवी हुंडेकरी, मीनाताई गायकवाड, हाजी म्हेहमूद शेख, मुन्ना बेलीफ, करीम शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here