हॉटेल भाग्यलक्ष्मी डिलक्समध्ये फूड फेस्टिव्हलचे फित कापून उदघाटन करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के. शेजारी जोतिराम जाधव, सौ. राजश्री जाधव आदी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

जयसिंगपूर ,ता.२७: लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. तरीही हॉटेल व्यवसायिकांनी नव्या उमेदीने पुन्हा व्यवसायात प्रगती सुरू ठेवली आहे. जोतीराम जाधव यांच्यासारख्या हॉटेल व्यवसायिकांनी खवय्यांना वेगवेगळ्या उपक्रमातून खाद्य संस्कृतीची लाभ देण्याचा प्रयत्न केला. फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून एक चांगली संधी जयसिंगपूर, इचलकरंजीसह परिसरातील खवय्यांना त्यांनी उपलब्ध करून दिल्याचे गौरवोद्गार, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी काढले. हॉटेल भाग्यलक्ष्मी डीलक्समध्ये नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने आयोजित दुसऱ्या फूड फेस्टिव्हलच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. फित कापून फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जोतीराम जाधव, माजी नगरसेविका सौ राजश्री जाधव, हेमंत कदम, सचिन पाटील, किशोर सावंत, अमित कदम, संतोष खरात, डॉ संतोष चौगुले, सुशांत भोसले, संतोष कॅटेगिरी, धनंजय वाघमोडे, यशवंत गुरव उपस्थित होते. दोन जानेवारीपर्यंत फेस्टिवल सुरू राहणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here