काँग्रेस पक्षातून राजन कामत यांची हकालपट्टी! (पक्ष शिस्त व काम न केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी:- चेतन भाऊ नरोटे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शहराध्यक्ष चेतन नरोटे आक्रमक झाले असून त्यांनी सचिव राजन कामत यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसे पत्र शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आज प्रसिध्द आहे.

सचिव कामत हे वारंवार सोशल मीडियावर पक्ष विरोधी वक्तव्य करून काँग्रेस पक्षाची बदनामी करीत असतात. यामुळे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी शनिवारी कामत यांना नोटीस देऊन खुलासा मागविला होता. परंतु त्यांनी कोणताही खुलासा सादर केला नाही. शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र त्यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जाहिर केले आहे.

यावेळी शहराध्यक्ष नरोटे यांनी पक्षात राहून काँग्रेस पक्षाची व नेत्यांची बदनामी करण्याचे काम जो कोणी करेल, तो किती ही मोठा नेता असला तरी त्यांच्यावर पक्ष यापुढे कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here