श्री पांडुरंग कारखान्याकडून ऊस वाहतुक ठेकेदारांना १२.५०% वाहतुक दरवाढीचा निर्णय!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(या निर्णयामुळे वाहतुक ठेकेदारामध्ये आनंदाचे वातावरण)

श्रीपुर (ता माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर यांनी मागील बऱ्याच दिवसापासून वाहतुक ठेकेदारांच्या वाहतुक दरवाढीबाबत असणाऱ्या मागणीबाबत तोडगा काढून गळीत हंगाम२०२१-२२च्या सुरुवातीपासून१२.५० टक्के वाहतुक दरवाढ देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शावर कारखान्याची वाटचाल सुरु असून कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ सुरु झाला असून या हंगामात कारखान्याकडून ऊस गाळपास सुरवात झालेली आहे पाठीमागील दोन वर्षापासून वाहतुक ठेकेदारांच्या डिझेल खर्चामध्ये सातत्याने वाढ होत त्यांनी डिझेल दरवाढ देणेबाबतची मागणी केली होती. सदरच्या मागणीस अनुसरुन व वहातुक ठेकेदारांच्या होणाऱ्या डिझेलवरील खर्चावर विचार करण्यात येऊन डिझेलचा दर व कारखान्याचा वाहतुक दर याचा समतोल साधत कारखाना व्यवस्थापनाने ही दरवाढ देण्याचे निश्चित केले असलेचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.
कारखान्याकडील तोडणी ठेकेदार यांची दरवाढ ही शासन स्तरावर होवून त्यांच्या दरवाढीची अंमलबजावणी करणेबाबत कारखान्यांना कळविण्यात येते परंतु वाहतुक ठेकेदार यांना कारखाना स्तरावरच वाहतुक दरवाढ द्यावी लागते. गतवर्षी तोडणी ठेकेदरांना ही त्यांच्या संघटनेने व शासनाने संयुक्तपणे तोडणी दरात वाढ दिली होती त्याची अंमलबजावणी कारखान्यांनी पूर्वीच केलेली आहे. महाराष्ट्रातील वाहतुक संघटनांनी चालू वर्षी संपाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच वाहतुक ठेकेदारांना वहातुक दरवाढ दिल्याने वाहतुक ठेकेदार खुष असून त्यांनी कारखान्यास सुरळीत ऊस पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. वाहतुक दरवाढीची अंमलबजावणी कारखाना गळीत हंगाम २०२१-२२ च्या सुरुवातीपासूनच करीत असल्याने या हंगामामध्ये वाहतुक ठेकेदारांना वाहतुक दरामध्ये जास्तीची रक्कम मिळून त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.
श्री पांडरंग कारखान्याने नेहमीच शेतकरी, तोडणी व वहातुक ठेकेदार यांचे हित जोपासले असून यांच्या पाठीशी उभा राहून अडीअडचणीच्या वेळी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणेच याहीवर्षी वहातुक ठेकेदारांना वहातुक दरवाढ दिलेली आहे.यावेळी कारखान्याचे संचालक,सर्व अधिकारी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here