ईगल लिप इंग्लिश मिडीयम स्कूलचे काम प्रेरणादायी:प्राचार्य मिलिंद फंड 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ईगल लिप इंग्लिश मिडीयम स्कूलचे काम प्रेरणादायी:प्राचार्य मिलिंद फंड

 

 

करमाळा येथील गुरुदेवशिक्षण प्रसारक मंडळ बारामती संचलित ईगल लीप इंग्लिश मीडियम स्कूल करमाळाव राणा नोबेल इंग्लिश स्कूल करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद फंड म्हणाले की संस्थेचे अध्यक्ष श्री महेश दिवेकर सर व मुख्याध्यापक स्वप्नाली दिवेकर यांचे कार्य खूपच प्रेरणादायी आहे. करमाळा तालुक्यामध्ये आशा कार्यक्रमाचे आयोजन करणारी ही पहिली शाळा ठरली आहे . कार्यक्रमाचे नियोजन व डेकोरेशन उत्तम प्रकारे केले आहे. एक वर्षांमध्ये या शाळेने खूप चांगली प्रगती केली आहे.

करमाळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री सुजित बागल यांनी सांगितले की तालुक्यातील इतर शाळांनीही असेच उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा.  यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी संस्थेची प्रशंसा करताना संस्थेला हवी ती मदत करू असे सांगितले.

छोट्या बालचमूंचा उत्कृष्ट कलाविष्कार पाहायला मिळाला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अहो रात्र प्रयत्न केले.

मुलांच्या या सर्व कार्यक्रमाला पालकांनी उस्फूर्तपणे दाद दिली प्रास्ताविक श्री लोहरा सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहिनी बागल यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here