महिला सक्षमीकरणावर भर देणार, विधानसभेत जाण्याची संधीदिल्यासपाणी,स्वच्छ्ता,रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणार — अनिलदादा सावंत
बक्षीस वितरण अनिल सावंत, पत्नी शैलजा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले
गणेश उत्सवानिमित्त अनिल सावंत यांच्याकडून दिनांक 18/9/2024 वेळ 4 वाजता, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमाचे स्थळ जोगेश्वरी मंगल कार्यालय, कार्यक्रमाला 5 हजार महिलांची उपस्थिती, उपस्थित प्रत्येक महिलांना साडीचे वाटप, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जमीर इनामदार, संतोष रनदवे, माधुरी नझरकर, सुप्रिया जगताप निका, काँग्रेस युवक शहर अध्यक्ष मनोज माळी, कॉंग्रेस महिला अध्यक्षा आयेशा शेख उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अनिल सावंत यांच्याकडून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी दिल्यास पिण्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार, तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न, शहरातील अंतर्गत रस्ते, स्वच्छ्ता, यावर प्रामुख्याने काम करणार असल्याचे वचन दिले
कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांशी संवाद
साधण्यात आला. यामध्ये काही महिला म्हणाल्या, कार्यक्रम खूप छान होता. खेळताना आणि खेळ पाहताना खूप मज्जा आली. खूप गर्दी होती, गर्दीमुळे भाग घेता आला नाही. त्यामुळे थोडी नाराज आहे. पण हरकत नाही. कार्यक्रम बघायला बघताना खूप एन्जॉय केला. अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया काही महिलांनी दिल्या. जेवण खूप छान होतं, दादांना आमदार होताना बघायला आवडेल असेही उद्गार काही महिलांच्या तोंडून ऐकायला मिळाले.
विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कपाळावर बिस्कीट ठेवून खाणे, फुगा, तळ्यात मळ्यात, डान्स इत्यादी खेळाचे आयोजन केले होते.
1) विजेत्यांची नावेआणि बक्षीस- आक्काताई गायकवाड, बिस्कीट स्पर्धेत प्रथम क्रमांक, बक्षीस led tv आणि पैठणी,
2) प्रतिभा कोष्टे दुसरा क्रमांक, बिस्कीट स्पर्धा, बक्षिस फ्रीज आणि पैठणी मला खूप आनंद झालाय, मला वाटलं नव्हत मी जिंकेल..
3) सपना साळुंखे, तिसरा क्रमांक, बक्षीस वॉशिंग मशिन, मी खूप एन्जॉय केला, खूप आनंद झाला.
5) जयश्री जगदाळे, पाचवा क्रमांक, शिलाई मशिन, मला शिलाई मशीन घ्यायची होती, आणि योगायोगाने बक्षीस म्हणून पण शिलाई मशीन मिळाली, त्यामुळे खूप आनंद होतोय.
6) सहावे बक्षीस- विविध खेळात जिंकलेल्या स्पर्धकांना २५पैठणी साड्यांचे वाटप!
कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरणानंतर करण्यात आली. बक्षीस वितरण अनिल सावंत, पत्नी शैलजा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ज्ञानदा किर्तीकर अप्पू फेम, आर्जे अक्षय, कार्यक्रम आणि खेळाचे सूत्र संचलन भारत मुंडे यांनी केले.