विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत, कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना अनुदानातुन युरिया व १५:१५ सुफला वाटप!
(पटवर्धन कुरोली व नारायण चिंचोली येथे कारखान्याच्या वतीने वाटप)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना मु. गंगामाई नगर पो. पिंपळनेर ता. माढा जि सोलापूर वतीने कारखान्याच्या सर्व शेतकरी सभासदांना युरिया आणि १५:१५ सुफलांचे वाटप करण्यात आले. कारखान्याच्या वतीने हे सभासद व शेतकऱ्यांना, वाटप करण्यात आले यावेळी कारखान्याच्या वतीने प्रत्येक गावोगावी टेम्पोद्वारे हे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी पटवर्धन कुरोलीतील युवा नेते नागेश उपासे. कारखान्याचे ओव्हरशिअर, पाटील साहेब, मार्गदर्शक शिवाजीदादा नाईकनवरे, राजू आबा नाईकनवरे, अनिल सावंत अनिल जवळेकर दादा साखरे, संजय घुले, बाबू नाईक नवरे,आप्पा नाईकनवरे, रावसाहेब नाईकनवरे, सलिम शिकलकर, बाबासाहेब नाईकनवरे आधी सर्व आमदार बबनदादा शिंदे व रणजीत भैय्या शिंदे यांचे सर्व समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.