*राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अतुल मालक पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यातील झाले सर्व सेलचे पक्षप्रवेश!*
*सांगोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज:- अतुल मालक पवार*
*(अतुल मालक सांगोला तालुक्याच्या मना:तील काळजाचा तुकडा आहे:- रामेश्वर मासाळ)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज सांगोला तालुक्यातील विविध जाहीर पक्षप्रवेश व पदाधिकारी निवडी, आज सांगोला तालुक्याचे राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्यांची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे.
असे अतुल मालक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडी संपन्न झाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा व सांगोला तालुक्याचे प्रभारीपद असलेले रामेश्वर माशाळ यांची या सर्व निवडी प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. या निवडी साठी तालुकाध्यक्ष अतुल मालक पवार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्यातील संघटनात्मक बांधणी करण्यासाठी अतुल मालक पवार यांनी चांगले काम केले असल्याचे यावेळी दिसून आले..
यावेळी पंढरपूर मंगळवेढा व सांगोला तालुक्याचे प्रभारी असणारे रामेश्वर माशा यांनी अतुल मालक पवार यांच्यावर कौतुकाची थाप टाकली. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की; पंढरपूर तालुक्यात एक मालक आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात एक मालक आहेत व सांगोला तालुक्यात अतुल मालक आहेत हे मला आज पहिल्यांदाच माहिती झाली सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता जरी अजित दादा पवार यांच्याकडे गेला तरी त्याच्या कामाचा जागेवरच निपटारा करण्याची पद्धत ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये असून याचा मला वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे सर्वसामान्यांच्या कामासाठी झटणारा नेता म्हणून अजित दादा पवार यांची ओळख असून त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे अतुल मालक पवार हे नक्कीच पक्ष वाढीसाठी व संघटना बांधण्यासाठी चांगले काम करतील असा मला ठाम विश्वास असून ते आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जवळा गटातून इच्छुक असून त्यांच्या मागे पक्षाचे संपूर्ण ताकद लावण्याचे काम माझे असून ते मी स्वतः लक्ष घालून लावणार असल्याचेही, रामेश्वर मासाळ यांनी सांगितले…
यावेळी सर्व विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी व जाहीर पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व तालुकाध्यक्ष अतुल मालक पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी या प्रसंगी केली होती..
