रणजित भैय्या बबनदादा शिंदे यांच्या आज माढा तालुक्यातील चार ठिकाणी कॉर्नर सभा
(कॉर्नर सभांच्या माध्यमातून साधणार सर्व मतदारांशी रणजीत भैया शिंदे संवाद)
माढा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांचा आज पासून प्रचार दौरा सुरू होत आहे चार ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी माध्यमांना दिली.
विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी यावेळी आपले चिरंजीव रणजीत शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. बबनराव शिंदे हे सहा टर्म पासून माढ्यातील आमदार आहेत. मतदारांशी नाळ जुळून घेण्यात बबनराव शिंदे यशस्वी ठरल्याने सातत्याने आमदारकी शिंदे घराण्याकडे आहे.
आज चार नोव्हेंबर सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत रणजीत शिंदे यांच्या कॉर्नर सभा चालणार आहेत.
असे आहे कॉर्नर सभेचे नियोजन..
माढा तालुक्यातील जामगाव या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत..
त्यानंतर वडाची वाडी (अंजनगाव उमाटे) येथील सार्वजनिक चौकात सहा ते सात वाजेपर्यंत एक कॉर्नर सभा असणार आहे.
रणजीत शिंदे आणि त्यांचे समर्थक अंजनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सायंकाळी सात ते आठ दरम्यान कॉर्नर सभा घेतील.
उंदरगाव येथील सार्वजनिक चौकात रात्री आठ ते रात्री 10 च्या दरम्यान कॉर्नर सभा आणि जनसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दिवाळी पाडव्याच्या स्नेहभेट कार्यक्रमा वेळी हजारो ग्रामस्थांनी आणि समर्थकांनी बबनराव शिंदे आणि रणजीत शिंदे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.
मानेगाव , बुद्रुक वाडी, मौजे धानोरे, कुंभेज, कापसेवाडी, हटकर वाडी, लोंढेवाडी, विठ्ठलवाडी, खैरेवाडी, आढेगाव, चांदज, वडोली, टाकळी (टेंभुर्णी), गार अकोले, आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, रांझणी गावांमध्ये गावकऱ्यांशी संवाद साधण्यात रणजीत शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.
या गावातील ग्रामस्थांचा शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शिंदे परिवारांनी याच सोबत अनेक गावे जनसंवादाच्या माध्यमातून पिंजून काढली आहेत. विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी केलेल्या विकास कामामुळे गावकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण आहे.
एमआयडीसीतील उद्योजक सुसंवाद मेळाव्यात मतदारसंघातील तरुणांना इथेच काम मिळण्यासाठी नवनवीन उद्योग सुरू करण्याच्या रणजीत शिंदे यांच्या वक्तव्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.तसेच छोट्या उद्योजकांना पूरक वातावरण निर्माण करण्याबाबत उद्योजकांशी केलेल्या त्यांच्या चर्चेमुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.