न्यु सातारा इन्स्टिट्यूट, कोर्टी-पंढरपूर येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर : न्यु सातारा समूह, मुंबई संचलित न्यु सातारा इन्स्टिट्यूट, कोर्टी (पंढरपूर) येथे दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी पॅलेस, कराड रोड, पंढरपूर येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे प्राचार्य, अध्यक्ष मा.डॉ. यशवंत पाटणे, न्यु सातारा समूहाचे सचिव मा.श्री. गोरख बापू पाटील तसेच न्यु सातारा समूहाचे विश्वस्त मा.डॉ. लक्ष्मीकांत राजाराम निकम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बाळकृष्ण कुलकर्णी यांनी मांडले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी इन्स्टिट्यूटने विविध स्तरावर केलेल्या यशस्वी कामगिरीची माहिती दिली.
यावेळी मनोगतात प्राचार्य लोंढे न्यु सातारा पॉलिटेक्निक, म्हणाले की, “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षकच करतो. न्यु सातारा समूह नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध राहील.”
मा.डॉ. यशवंत पाटणे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ज्ञानदानाचे कार्य हे सर्वात पवित्र कार्य असून शिक्षकांनी सतत आत्मपरीक्षण करत विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे. शिक्षक दिन हा केवळ उत्सव नसून तो शिक्षकांच्या त्याग आणि समर्पणाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गुरु-शिष्य परंपरेतील पावित्र्य जपत आजच्या पिढीला घडवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करायचे आहे.
मा.श्री. गोरख बापू पाटील (सचिव) यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचा गौरव पूर्ण उल्लेख करत शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले.
मा.डॉ. लक्ष्मीकांत राजाराम निकम यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य जागृती पांचाळ यांनी केले. आभार मानताना त्यांनी सांगितले की, “आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि शिक्षकवृंदाचे मी मनःपूर्वक आभार मानते. शिक्षक दिन हा आपणा सर्वांना आपल्या जबाबदारीची पुन्हा जाणीव करून देणारा दिवस आहे.” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यु सातारा इन्स्टिट्यूट, कोर्टी पंढरपूर येथील संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
