
तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या प्रयत्नामुळे गवळी, शेख, पटेल चवरे माळे वस्ती येथील रस्त्याचे काम पुर्ण!
तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता:रमेश माने तालुकाध्यक्ष.
मोहोळ तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या पेनुर येथील पंढरपूर रस्त्या नजीक गवळी शेख पटेल व चवरे वस्ती येथे रस्त्यासाठी त्यावेळचे सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या जिल्हा नियोजन फंडातून सदर रस्तासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.
त्यावेळी सुरू झालेले काम आज अखेर पूर्ण झाले असून पेनुर वासपासच्या वाड्यावर त्यावरील नागरिकांचा व शेतकऱ्यांचा मूलभूत रस्त्याचा प्रश्न यामुळे सुटला आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अतिशय वेगवान होणार असून यासाठी माझी पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मोहोळ तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश माने पेनुर ची उपसरपंच उद्योजक सागर मास्तर चवरे, कॉन्ट्रॅक्टर श्री भूषण शिंदे, यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते यासाठी जवळजवळ चंद्रकांत दादा पाटील यांनी १५ लाख रुपये चा निधी मंजूर केला होता. हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करण्यात येईल असे सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांनी आश्वासित केले होते.
यावेळी श्री दादासाहेब गवळी , श्री राजेंद्र चवरे , श्री अमोल गवळी , इंजिनिअर श्री फजल शेख ,श्री अंकुश (नाना)गवळी ,श्री नागनाथ गवळी, श्री अल्ताफ पटेल , श्री दिगंबर गवळी आदी मान्यवर मित्रपरिवार उपस्थित होता.