
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांचा बापूराव तळेकर यांनी केला सन्मान!
(माजी खासदार राजू शेट्टी यांची बापूराव तळेकर यांच्यावर कौतुकांची थाब)
करमाळा तालुक्यातील पोचरे येथे काल श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या व शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे आले असता यावेळी केम गटातील उमेदवार बापूराव ज्ञानदेव तळेकर यांनी त्यांचा तालुक्याच्या वतीने सन्मान केला.
यावेळी उमेदवार बापूराव ज्ञानदेव तळेकर यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. बाबुराव तळेकर यांनी तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या आडचणींना सामोरे जाऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे व वेळोवेळी विविध आंदोलन असेल शेतकऱ्यांच्या ऊस दरा बाबत आंदोलन असेल किंवा अन्य अडचणी सोडवण्यासाठी ते वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जातात याची दखल घेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी माझ्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत असे यावेळी बापूराव तळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.