
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नूतन तालुका मंडळ अध्यक्ष रमेश माने यांचे अभिनंदन!
(अभिनंदनाचे पत्र पाठवीत तालुकाध्यक्ष रमेश माने यांची केले कौतुक)
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण मंडळ अध्यक्षपदी पेनुर चे रहिवासी रमेश माने यांची निवड झाल्याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री व नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना अभिनंदनपर पत्र पाठवून त्यांना पुढील भविष्यकाळात शुभेच्छा दिलेल्या आहेत.
या पत्रामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष हे कार्यकर्ताधिष्ठीत जनसंघटन असून याचा पाया, संवादाच्या सूत्रावर बांधण्यात आला आहे पक्षाची मंडळ अध्यक्ष या नात्याने पाया बळकट करणे जबाबदारी आता आपल्या सक्षम खांद्यावर असून बुथ सक्षमीकरण, कार्यकर्ता संवाद आणि जनसंपर्कातून समर्थन या त्रिसूत्रीवर आपल्याला येत्या काळात काम करायचे आहे.
भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून आपण जोडून घेतलेली प्रत्येक व्यक्ती पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्याचबरोबर भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपल्याला जन्माचा घेऊन जायचे आहे असे विशेष पर उल्लेख या पत्रात केला असून या पत्रामुळे दक्षिण तालुका मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या रमेश माने यांचा उत्साह अधिक गतिमानतेने वाढला आहे. हे पत्र प्राप्त झाल्याबद्दल व नूतन दक्षिण मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नूतन तालुकाध्यक्ष रमेश माने यांचा तालुक्यातील प्रत्येक गावो-गावी योग्य सन्मान करण्यात येत आहे.