*हाजी शौकतभाई तलफदार मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने, महिलांना रमजान किटचे वाटप!*
*(तलफदार कुटुंबाचा हा उपक्रम म्हणजे रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये स्तुत्य उपक्रम आहे:- शशिकांत नाना चव्हाण)*
*(सर्वधर्मसमभाव राखणे व ती पार पाडणे ही काळाची गरज बनली आहे:- प्रा. माऊली जाधव सर)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर, मोहोळ शहरातील सर्व गोरगरीब मुस्लिम कुटुंबीयांना हाजी शौकतभाई तरफदार मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने सर्व मोहोळ शहरातील, मुस्लिम कुटुंबीयांना रमजान ईद साठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे जवळजवळ १००० महिलांना किट वाटप करण्यात आले..
या कार्यक्रमासाठी मोहोळ नगर परिषदेचे सर्व नूतन नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व नव्याने निवड झालेले पंचायत समितीचे सभापती अस्लमभाई चौधरी, उपसभापती उल्काताई पाटील याचबरोबर सर्व नगरसेवकांचा यावेळी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला..
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राज्यमंत्री राजन मालक पाटील सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, , कुरुल जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सचिन दादा जाधव, अंकुश भैय्या अवताडे प्रा. माऊली जाधव सर, नरखेड गटाचे जिल्हा परिषदेचे लखन दादा शिंदे, मुजीब भाई मुजावर, त्याचबरोबर सर्व मोहोळचे नगरसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते..
यावेळी माजी आमदार राजन मालक पाटील यांनी सर्व मुस्लिम समाजाला येणाऱ्या रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या व भारतीय जनता पार्टीने जवळजवळ या मोहोळ नगर परिषदेमध्ये तीन नगरसेवक निवडून आणले असून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आग्रहाची मागणी करून मोहोळ पंचायत समितीच्या सभापती पदी असलम भाई चौधरी यांची बिनविरोध निवड केली आहे..
भाजपा हा सर्वधर्मसमभाव सांभाळणारा व मानणारा पक्ष असून एक मुस्लिम माणूस सभापतीपदी देऊन आम्ही सर्वधर्मसमभावाची प्रचिती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्याने दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन यावेळी राजन मालक पाटील यांनी दिली…
यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी सुद्धा हाजी शौकतभाई तलफदार, यांनी जो रमजान महिन्यांमध्ये तरी कुटुंबांना किट वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्याचे कौतुक केले आपण नगर परिषदेला पाच उमेदवार दिले होते त्यातील तीन मुस्लिम उमेदवार आपण निवडून आणले आहेत भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य व तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी काम करणारा पक्ष असून या पक्षाचे काम गाव पातळी पासून ते देशपातळीपर्यंत आहे ज्या शादी खाना साठी यांनी निवेदन दिले आहे त्यासाठी मी नक्कीच कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या सर्व मागण्या मान्य करणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे सर्व ज्येष्ठ कनिष्ठ नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात संख्येने मुस्लिम समाज बांधव व महिला, उपस्थित होते..
