
पांडुरंग कारखान्याचे एमडी डॉ.यशवंत कुलकर्णी यांना देश पातळीवरील “इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कार” जाहीर!
(योग्य प्रशासन व अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून देशपातळीवरील नामांकित कारखान्याच्या यादीत समावेश करणारे डॉ.यशवंत कुलकर्णी यांचे काम उल्लेखनीय)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना देश पातळीवरील द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेचा “इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड” जाहीर झाला असूऩ, त्याचे वितरण 25 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी दि.01/01/2014 साली स्वीकारली असून, आतापर्यंत त्यांनी कारखान्यांमध्ये 12 वर्षे सलगपणे कार्यकारी संचालक पदावर काम केले आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी स्विकारल्यापासून कारखान्यांमध्ये अहोरात्र मेहनत करून कारखाना यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे. त्यांच्या कार्यकाळात कारखान्याचे विस्तारीकरण होऊन प्रतिदिन सुमारे 10 हजार मे.टनापर्यत गाळप क्षमतेने कारखाना गाळप करीत असून आसवनी प्रकल्पाचेही विस्तारीकरण केले असून तो प्रकल्पही 90 के.एल.पी.डी. क्षमतेने सुरू आहे.
त्याचप्रमाणे को-जनरेशन प्रकल्पामध्येही वाढ केली असून जनरेशन प्रकल्प 32 मेगावॅट क्षमतेने सुरु आहे.
कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक), व्हा.चेअरमन मा.श्री.कैलासराव खुळे आणि संचालक मंडळ यांच्या सहकार्याने कारखान्यामध्ये अनेक अमुलाग्र बदल केले असून, त्यामध्ये संपूर्ण कारखान्याचे संगणकीकरण, सुपंत बायो फर्टिलायझर लॅब, मोबाईल ॲपचा वापर, ऊस विकासाच्या विविध योजना, सभासद मेडिक्लेम योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मानव विरहीत वजन काटा, 25 हजार वृक्षांची लागवड याशिवाय कामगारांमध्ये शिस्त, कामगारांना ड्रेस कोड इत्यादी बाबींचा समावेश असून संपूर्ण कारखान्यांमध्ये सी.सी.टीव्हीचा वापर, सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून कारखाना व्यवस्थित चालवून सुस्थितीत आणला आहे. या सर्व विशेष योगदानाची दखल घेऊन द शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना “इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कार” दिला आहे. हा पुरस्कार संपुर्ण देशामध्ये साखर कारखानदारीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) व्हा.चेअरमन कैलासराव खुळे, मा.श्री.उमेशराव परिचारक आणि सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सलग १२ वर्षे साखर कारखानदारी मध्ये योग्य प्रशासन सुशासन व सर्व कामगारांना ड्रेस कोड लागू करणे मनुष्य विरहित वजन काटा वापरणे, याचबरोबर कारखानदारीत रोज नवनवीन प्रयोग करून कारखानदारीमध्ये श्री सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे नाव देशपातळीवर उच्च श्रेणीत नेणारे डॉ. यशवंत शंकरराव कुलकर्णी हे अत्यंत कडक शिस्तीचे लोकप्रिय कार्यकारी संचालक आम्हाला लाभल्यामुळे कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना व कामगारांना यामुळे मागील १२ वर्षात योग्य शिस्त कुलकर्णी साहेब यांच्यामुळे लागली आहे
प्रशांत परिचारक
मा. विधान परिषद सदस्य