पंढरपुरच्या यमाई तलावात मृत माशांचा मोठ्ठा खच
(समाजसेवक गणेश अंकुशराव यांचा खुलासा)
पंढरपुरच्या यमाई तलावात हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या या माशांचा मोठ्ठा खच तलावाच्या काठावर आढळून आलाय.
यासंदर्भात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक गणेश अंकुशराव व समाजसेवक बापु शिंदे यांनी यमाई तलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. यानंतर गणेश अंकुशराव यांनी यासंदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे.
यमाई तलावात अचानकंच एवढ्या मोठ्या संख्येने माशांचा मृत्यू कशामुळे झाला? असा प्रश्न उपस्थित करत गणेश अंकुशराव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यमाई तलाव परिसर हा निसर्गरम्य परिसर असुन याठिकाणी विविध पक्षी व प्राण्यांचा वावर असतो. याचबरोबर अनेक पंढरपूरकर सकाळ संध्याकाळी या ठिकाणी कुटूंबासह फिरायला येत असतात. त्यामुळे याठिकाणी असलेल्या पर्यावरण व जैवविविधतेसोबतच, पशुपक्षी, व मनुष्य प्राणी यांच्या जिवीतासही मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळे
आता या माशांच्या आकस्मिक मृत्यूच्या घटनेमुळे यमाई तलावातील पाणी दुषीत झालेय का? कशामुळे ही घटना घडली? तलावात कुणी विषारी पदार्थ तर मिसळले नाहीत ना? याची चौकशी करून प्रशासनाने हे मृत माशांचे पोष्टमार्टेम करुन त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला? याची तपासणी तातडीने करावी. या प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे. जर तातडीने याचा शोध लागला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
