पंढरपूर पोलीस पथकाची अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई!
(३,२७०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त)
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रांजणी या गावी २३
डिंसेबर २४रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी
भोसले यांना
मिळालेल्या माहितीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एच.डी.पी.ओ सोलापूर कार्यालय स्टॉप व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ यांच्या एकत्रित कारवाई करीत मौजे रांजणी गावात सदर कारवाई करण्यात आली.
यावेळी घटना स्थळी प्रदीप अवताडे यांचे राहते घरी कारवाई वेळी जिन्याखाली देशी दारूचे एकुण ९६ बॉक्स अवैधरित्या बाळगलेल्या स्थितीत आढळून आले आहेत सदर आरोपी प्रदीप आवताडे यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.तसेच सर्व ९६ बॉक्स दारू जप्त करण्यात आले असून सदर देशी दारूची एकूण किंमत
३,२७,००० ( तीन लाख २७ हजार रुपये) इतकी आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस कॉन्स्टेबल रोंगे, ए एस आय तोडले, पोलीस हेडकॉन्स्टेबल रोकडे यांच्या पथकाने केली सदर कारवाई आहे.