पंढरपूर नगरपरिषदेस सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी मिळावा:- मा.आ. प्रशांत मालक परिचारक
(मा आमदार प्रशांत परिचारक यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची विविध मागण्यासाठी भेट)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील नामसंकिर्तन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अंदाजे ₹२० कोटींचा निधी आवश्यक आहे. तसेच पंढरपूर शहरातमध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी आणि शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ३५ एम.एल.डी. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि २० एम.एल.डी. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे.
या केंद्रांच्या वीजबिलासाठी पंढरपूर नगरपरिषदेवर दरवर्षी ₹०७ ते ₹०८ कोटी इतका प्रचंड आर्थिक भार पडतो. या वीजखर्चात बचत करण्याच्या उद्देशाने सुमारे ०३मेगाव्हॅट इतका सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविल्यास नगरपरिषदेची दर महिन्याला सुमारे ₹७० ते ₹८० लाखांची बचत होईल.
अशा या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आवश्यक निधी नगरविकास विभागामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केली.

