आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरात सोमवारी युवासेनेच्या १४शाखांचे होणार उद्घाटन: शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली
(आ. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यावर आधारित ध्वनी गीताचा होणार प्रसारण शुभारंभ)
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०वाजता सांगोला शहरात युवासेनेच्या १४शाखांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असुन आम.शहाजीबापू पाटील यांच्या कार्यावर आधारित ध्वनी गीताचा प्रसारण शुभारंभही होणार असल्याची माहिती शिवसेना सांगोला शहरप्रमुख माऊली तेली यांनी दिली आहे.
सांगोला शहरात युवा सेनेच्या १४ शाखांचा उद्घाटन सोहळा शिवसेनेतील मांन्यवरांच्या हस्ते व पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोमवारी, सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. युवासेना शाखांचे उद्घाटन युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील, शिवसेना नेते दिग्विजयदादा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, शिवसेना विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदकाका घोंगडे ,शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली, शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख राणीताई माने ,शिवसेना शहरप्रमुख महिला आघाडी छायाताई मेटकरी, शिवसेना महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर उपप्रमुख अस्मिर तांबोळी, शिवसेना शहर उपप्रमुख विजय इंगोले, शिवसेना समन्वयक अरुण बिले ,शिवसेना शहरप्रमुख एस. सी सेल कीर्तीपाल बनसोडे, शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश्वर यावलकर, मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, शिवसेना शहर सहसंघटक अरुण पाटील, युवासेना शहरप्रमुख समीर पाटील, युवासेना शहर उपप्रमुख सुजित भोकरे, शिवसेना शहरप्रमुख ओबीसी सेल आयुब मुलाणी, युवासेना शहर उपप्रमुख काशिलिंग गाडेकर, युवासेना शहर उपप्रमुख सागर नरुटे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहेत. यामध्ये सांगोला शहरातील युवासेना शाखा अहिल्यानगर, युवासेना शाखा जयभवानी चौक ,युवासेना शाखा भुईटेवस्ती ,युवासेना शाखा खारवटवाडी, युवासेना शाखा इंगोलेवस्ती, युवासेना शाखा सुरवसे – केदारवस्ती, युवासेना शाखा पुजारवाडी , युवासेना शाखा सनगरगल्ली, युवासेना शाखा इंदिरानगर वसाहत ,युवासेना शाखा वंदे मातरम चौक, युवासेना शाखा संजयनगर शाखा नं – 1 ,शिवसेना शाखा संजयनगर शाखा नं 2 ,युवासेना शाखा वाढेगाव नाका, युवा सेना शाखा आनंदनगर, सांगोला या शाखांचा शुभारंभ होणार आहे.