मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वतीने मदत व सहाय्यता सुविधा केंद्र सुरू!
ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा केल्यामुळे मतदारसंघातील महिलांची होणार मोठी अडचण दूर!
मोफत नोंदणीसाठी मिरज रोड वरील संपर्क कार्यालयात सकाळी १० ते सायं ०६ सुविधा उपलब्ध
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कणखर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी सुरू झाली असून यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक विद्यमान आमदारांनी पुढे येत या योजनेचा लाभ घेण्याची आवाहन सर्व माता-भगिनींना केले आहे.
यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार अँड शहाजी बापू पाटील, यांनीही संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी आपल्या सांगोला येथील संपर्क कार्यालयामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत मदत व सहायता मोफत सुविधा केंद्राची निर्मिती केली असून या कार्यालयातून सर्व गरजू व लाभार्थी महिलांना मोफत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा आ. अँड शहाजी बापू पाटील यांनी केल्यामुळे मतदार संघातील सर्व महिला वर्ग सुखावला आहे.
यामध्ये सर्व लाभार्थी महिलांनी या मदत केंद्राचा लाभ घ्यावा व या शासकीय योजनेचा परिपूर्ण आनंद घ्यावा असे आवाहन संपर्क कार्यालयाचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे.
यासाठी येताना सर्व महिलांनी सोबत सर्व कागदपत्रे व्यवस्थित झेरॉक्स प्रति सह घेऊन याव्यात असे आवाहनही या माध्यमातून गायकवाड यांनी केले आहे.