
नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा उद्या मोहोळ येथे भव्य स्वागताची जय्यत तयारी!
शेटफळ चौकातून मोहोळ पर्यंत निघणार भव्य अशी जंगी स्वागत मिरवणूक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील हे निवड झाल्यानंतर प्रथमच मोहोळ तालुका येत असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा यांच्यावतीने भव्य अशी स्वागत जंगी मिरवणुकीची तयारी करण्यात आली असून, सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या मोहोळ येथील सावली बंगल्यावर उमेश दादा पाटील हे दिवसभर थांबून, सर्वांचा सत्कार स्वीकारणार आहेत. त्याचबरोबर शेटफळ चौकातून मोहोळ कडे येणाऱ्या महामार्गावरून भव्य अशी जंगी स्वागत मिरवणूक ही उमेश दादा पाटील यांचे काढण्यात येणार असून त्यानंतर मोहोळ येथील शिवाजी चौकापासून ते गवत्या मारुती चौकापर्यंत त्यांची मिरवणूक निघणार आहे. या सर्व मिरवणुकीसाठी व स्वागत समारंभासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या सर्वच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सर्व समर्थकांनी व उमेश दादा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यासाठी उपस्थित राहण्याची आवाहन जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद आतकरे यांनी सर्वांना केले आहे..