स्वराज्य पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भोसे येथे महामंडळ महा एक्सपो चे आयोजन:- प्रा. महादेव तळेकर सर
सर्व जाती धर्मातील लोकांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान व झिरो टक्के व्याजाने व्यावसायिक कर्ज उपलब्ध करणार:- प्रा. महादेव तळेकर (सर)
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती युवराज संभाजी राजे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील व बच्चुभाऊ कडू व राजरत्न आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!
स्वराज्य पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे प्राध्यापक महादेव तळेकर सर यांनी एक आगळी वेगळी संकल्पना आयोजित केली असून, त्यांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी महामंडळ महा एक्सपो आयोजित केला असून यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना रुपये 50 हजारापासून ते 50 लाख रुपये पर्यंतचे व्याज परतावा कर्ज व त्याला अनुदान असून या महा एक्सपो, चा लाभ सर्व सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्रा. महादेव तळेकर (सर) यांनी केले आहे.
यामध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा १)महामंडळ समन्वयक२) सर्व बँकांचे प्रतिनिधी३) सर्व वाहन विक्रेते ४) सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने प्रात्यक्षिक५) सर्व शासकीय दाखले काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र ६) प्रोजेक्ट रिपोर्ट साठी CA,७) व नोटरी पब्लिक असून यामध्ये जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील १३ महामंडळाचा समावेश असून अनेक योजनांद्वारे अनेक लाभार्थ्यांना याची अनुदानही मिळणार आहे.
याचबरोबर सर्व जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज महिला बचत गटांना स्वतंत्र बिनव्याजी कर्जपुरवठा असणार असून यामध्ये जणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी प्रा. तळेकर सर यांच्याकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती युवराज संभाजीराजे, प्रहार पक्षाचे प्रमुख मा. बच्चु(भाऊ) कडू, माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर साहेब, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील शिवतेजसिंह बाबा मोहिते पाटील, व मा डॉ.श्रीमंत कोकाटे सर हे उपस्थित राहणार असून हा महा एक्सपो १४ ऑगस्ट २०२४ रोजी ते रायगड लॉन्स येथे होणार आहे अशी माहिती यावेळी प्रा. महादेव तळेकर सर यांनी दिली.