लोकसभेत माझा पहिला आवाज शेतकऱ्यांचा आणि आरक्षणाचा राहील, भारतानाना यांनी सुरू केलेले विकासकामे पूर्ण करायचे आहेत :खा.प्रणिती ताई शिंदे
(लोकसभा निवडणुकीत मला मतदान करून विजयी करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील गावोगावच्या मतदारांचे, अजोड मेहनत घेतलेल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार, तुमचे समस्या सोडविण्यासाठी कायमच कटीबद्ध आहे :-खा. प्रणितीताई शिंदे)
(पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आभार मानण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. म्हणून मतदान केलेल्या आणि गावातील जनतेचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत गावभेट दौरा आयोजित केले असून आज रोजी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, गादेगाव या गावांना भेट देऊन जनतेचे, मतदारांचे, विजयासाठी अजोड मेहनत घेतलेल्या पंढरपूर तालुक्यातील गावोगावच्या काँग्रेस, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
तसेच या गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, गादेगाव गावातील ग्रामस्थांनी MSEB, शासकीय दाखले, शेतीसाठी कॅनलचे पाणी, आरोग्य, रस्ते, दुधाला दर, यासारख्या इतर अनेक समस्या मांडल्या. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडविण्याचे आदेश दिला आणि काही समस्या शासन दरबारी मांडून सोडविणार असल्याचे सांगितले.
या भावभेट दौऱ्यात युवा नेते भगीरथ भालके, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील, नागेश फाटे, मनोज यलगुलवार, संदीप पाटील, किरणराज घाडगे, मिलिंद भोसले, प्रशांत शिंदे, राहुल पाटील, योगेश ताड, मधुकर मोरे, दत्तात्रय कांबळे, दाजी देशमुख, सीताराम भुसे, विलास रोंगे, पांडुरंग रोंगे, समाधान रोंगे, शशिकांत बागल, गणेश बागल, रणजित बागल, संग्राम जगताप, भास्कर बागल यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिकारी शहाजी राऊत, बांधकाम विभागाचे एस. एन. लवटे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी कर्णवर साहेब, विराज पाटील, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, तलाठी अनिल बागल, ग्रामविकास अधिकारी रमेश काळे, MSEB चे सारिका जावळे, पोलीस अधिकारी विश्वास पाटील यांच्यासह इतर अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.