आमदार अमित गोरखे यांना मंत्रीमंडळात घ्यावे!
(भाजपाचे वरीष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर मातंग समाजाच्या वतीने मा. अँड. बादल यादव यांनी लेखी पत्राद्वारे मागणी)
राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जनतेने महायुती बाजून कौल दिला या विजयासाठी अनेक समाज घटकाटील पक्षाने, नेते मंडळींनी जीवाची बाजी लावत मोठी ताकद ऊभा केली.
नवे सरकार स्थापन होत आहे यामध्ये अनेक नवे देखील दिसणार आहेत अशातच नवनिर्वाचित मा. आमदार श्री अमितजी गोरखे हे पक्षाच्या आशीर्वादान परिषदेत गेले आहेत.
आमदार श्री अमितजी गोरखे यांनी दिलेल्या संधीचा मान ठेवून मातंग समाज, बहुजन समाजात लोकसंख्या जास्त असलेल्या गावांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना व महायुतीला वाढीव मतदान मिळावे यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे.
हा विजय महोत्सव साजरा होत असताना उच्चशिक्षित,कुशल संघटक आमदार श्री अमित गोरखे यांना आणखी चांगल्या पद्धतीने समाज कार्य करण्यासाठी, बहुजन समाजाची सेवेसाठी मंत्रिपदाच्या माध्यमातून संधी मिळावी अशी मागणी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांमा मा. अँड. बादल यादव यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.