मायाक्कादेवी महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आठ नोव्हेंबर रोजी भरगच्च कार्यक्रम!
(मायाक्कादेवी कृषी केंद्राचे माननीय धनाजी (भाऊ) बिचुकले यांच्या शुभहस्ते भव्य उद्घाटन)
(कार्यक्रमाला उद्योगपती श्री मारुती माळी साहेब (चेअरमन ब्रह्मा उद्योग समूह) व विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सांगोला तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा मायाक्का देवी उद्योग समूहाने अजून एका उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवले असून दिनांक ८ नोव्हेंबर रोजी मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. याचवेळी नव्याने सुरू केलेल्या मायाक्का देवी कृषी केंद्राचे उद्घाटन मंगळवेढा येथील सिद्धनाथ कृषी केंद्राचे प्रमुख धनाजी (भाऊ) बिचुकले व उद्योगपती मारुती माळी साहेब चेअरमन ब्रह्मा उद्योग समूह यांच्या शुभहस्ते होणार आहे.. याच ठिकाणी सायंकाळी उद्योगपती मारुती माळी यांचे महाराष्ट्र राज्यातील तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करणारे व संपूर्ण महाराष्ट्रात घराघरांमध्ये एक तरी उद्योजक घडावा या ध्येयाने प्रेरित होऊन व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्या व्याख्यानाला सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही चेअरमन मधुकर करे यांनी केले आहे..
हा कार्यक्रम सांगोला तालुक्यातील मंगळवेढा रोडवरील घेरडी येथील मायाक्का देवी अर्बन महिला को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठिकाणी होणार असल्याची माहिती चेअरमन श्रीनिवास मधुकर करे यांनी दिली आहे..
मायाक्का देवी उद्योग समूह अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आलेला मोठा उद्योग समूह असून सांगोला मंगळवेढा भागामध्ये यांचे मोठे कार्य पाहायला मिळत आहे..
*कोट*
*चेअरमन श्रीनिवास करे यांच्या दूरदृष्टीमुळे मायाक्का देवी उद्योग समूह उत्तरोत्तर प्रगती करत असून त्याच्यात अजून एक पाऊल म्हणून त्यांनी घेरडी येथे नव्याने कृषी केंद्राची सुरुवात केली असून अनेक उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी समजले सर्व गोरगरीब व वंचित घटकाला मदत करण्याचे कार्य सदैव केले आहे.. त्यांचे सांगोला व घेरडी येथे क्रेडिट सोसायटीच्या दोन शाखा भविष्यकाळामध्ये या सर्व शाखांचा आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विस्तार करणार असल्याचे यावेळी चेअरमन मधुकर कर यांनी सांगितले.*
