
माढा तालुक्यात सतत पडत असणार्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करण्यात यावा:- योगेश पाटील
(तालुक्यातील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना पाच जून पर्यंत विमा मिळणार:- तालुकाध्यक्ष योगेश पाटील)
आज माढा तालुक्यातील मागील १० दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतीपिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने करपा तेल्या या रोगामुळे द्राक्षे, केळी, डाळिंब इतर पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घराची पडझड अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात संदर्भात निवेदन भारतीय जनता पार्टी माढा तालुकाध्यक्ष श्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तहसीलदार साहेब यांना देण्यात आले संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना विषयी सखोल माहिती घेतली व लवकरात लवकर लाभार्थ्यांना निधी देण्यात यावा यासाठी संबंधित अधिकारी यांच्या बरोबर चर्चा झाली पिक विमा संदर्भात कृषी अधिकारी माढा यांच्याशी उद्यापासून वंचित असणारे शेतकऱ्या विषयी सखोल चर्चा झाली उर्वरित पात्र शेतकऱ्यांना पाच जून पर्यंत पिक विमा मिळेल असे त्यांनी सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टी माढा तालुकाध्यक्ष श्री योगेश पाटील, जेष्ठ नेते श्री प्रकाश दादा कुलकर्णी, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री नंदकुमार मोरे, महिला मोर्चा माढा तालुका अध्यक्षा सौ मायाताई माने, लेंडवे मेजर,लाला झाडे प्रमोद रोटे पांडुरंग राऊत, विवेक कुंभेजकर, सोमनाथ वाघमारे, शंकर मुळुक, बिरुदेव भैय्या शेळके, अर्जुन माने लखन पवार अमोल देशमुख आदी अनेक भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…