
मा.ना. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत संस्थाचालक प्राचार्य व संस्था प्रतिनिधी यांचा संवाद कार्यक्रम संपन्न!
( C S R सर्व संस्था चालकांनी चांगल्या पद्धतीने उपयोग करावा मा. ना. चंद्रकांत दादा पाटील)
(असोसिएशन ऑफ सेल फायनान्स इन्स्टिट्यूट यांच्या वतीने प्राध्यापक रामदास झोळ यांनी केला चंद्रकांत दादा पाटील यांचा सन्मान)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी शिवाजीनगर पुणे 5 आणि असोसिएशन ऑफ सेल फायनान्स इन्स्टिट्यूट, यांच्या संयुक्त विद्यमाने काल पुणे येथील शिवाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, व प्राध्यापक डॉक्टर गजानन र एकबोटे कार्याध्यक्ष प्रो ए सोसायटी यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थाचालक प्राचार्य संस्था प्रतिनिधी यांच्याशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास असोसिएशन ऑफ सेल फायनान्स इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष व दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय प्राध्यापक रामदास झोळ यांची प्रमुख उपस्थिती होती..
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की; संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा विस्तार वाढत असताना संस्था चालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. संस्थाचालकांनी त्यांच्या समस्या आमच्या पुढे मांडल्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून मी मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे त्यात सर्व संस्थाचालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार असून सर्वच संस्था चालकांनी (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) C S R अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करावा असे प्रतिपादन यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम पुणे येथील शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहामध्ये संपन्न झाला..
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाचालक, प्राचार्य, संस्था प्रतिनिधी, यांच्याशी हा संवाद कार्यक्रमाची करण्यात आला होता.
यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजाननराव एकबोटे, असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख मा. प्रा.रामदास झोळ, खजिनदार राजीव जगताप, संचालक प्रकाश पाटील, संस्थेचे सहकार्य वाहक डॉ ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाहक, प्रा.शामकांत देशमुख, उपकार्यवाह डॉ निवेदिता एकबोटे हे सर्वजण उपस्थित होते…
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुमच्या सगळ्या समस्यांवर जाईल संस्थांनी कार्पोरेट मधील सी एस आर फंडचा उपयोग शैक्षणिक कारणांसाठी करावा अशी सुचना मंत्री पाटील यांनी यांनी केली.
यावेळी प्रा रामदास झोळ म्हणाले की,सेल्फ फंडींग, शिष्यवृत्ती,एथड प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रे असे अनेक महत्त्वाचे विषयांमध्ये मंत्री महोदयांनी लक्ष द्यावे तसेच प्रवेश परीक्षा ही सगळ्यांसाठी एकच असावी म्हणजे प्रवेशाला उशीर होणार नाही व शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होईल. याबाबत काही तरी ठोस पावले उचलावीत अशी विनंती प्रा.झोळ यांनी केली.